धरणगाव तालुका काँग्रेसकडून रास्ता रोको

dharangaon-andolan

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – तालुका काँग्रेस कडून आज रस्ता रोको करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. शेतकऱ्यानं विरुद्ध मोदी सरकार ने केलेल्या काळ्या कायद्या विरुद्ध तसेच कामगारांन विरुद्ध केलेल्या जुलमी कायद्या विरुद्ध निषेध म्हणून आणि उत्तर प्रदेश सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
उत्तरप्रदेश मधील अत्याचार झालेल्या मुलीला भेटण्यासाठी गेलेल्या माननीय राहुल गांधींना व प्रियंका गांधींना योगी सरकारने ज्या पद्धतीने वागणूक दिली व युपी पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली याचा निषेधार्थ काँग्रेस कडून रास्ता रोको करून जक्काजाम करण्यात आला. यावेळेस मोदी सरकार विरुद्ध तसेच उत्तर प्रदेशच्या योगी सरकार विरुद्ध जोरदार घोषणा देण्यात आल्या.नंतर तालुका काँग्रेस कडून तहसीलदार देवरे यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनाच्या वेळेस महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.डी.जी.पाटील साहेब,जेष्ठ नेते आदरणीय सुरेश भागवत,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा.रतिलाल चौधरी,शहर प्रमुख मा.राजेंद्र न्हायदे,जिल्हा सर चिटणीस सम्राट परिहार सर, दीपक जाधव,जिल्हा रेशनिंग कमिटीचे सदस्य बंटी भाऊ पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष मनोज कंखरे, तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील, विजय जनकवार,रामचंद्र माळी, चंदू पाटील सर,विकास लांबोळे युवक काँग्रेस अध्यक्ष गौरवसिंग चव्हाण,गौरंग पटेल,राहुल मराठे, पंकज पाटील,निलेश पवार तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.dharagaon-rasta-rokodharangaon-congress

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here