सैनिक फेडरेशनच्या वतीने महार रेजिमेंटचा ७९ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न

mahar-regiment

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – दिनांक १ ऑक्टोबर २०२० रोजी सैनिक फेडरेशन महाराष्ट्र यांच्यावतीने महार रेजिमेंटचा ८९ वा वर्धापन दिन वेबेक्स अँप (webex App) माध्यमातून साजरा करण्यात आला. महार रेजिमेंट १ ऑक्टोबर १९४१ ला स्थापन झाली असून आता ८० व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यावेळी महार रेजिमेंटने केलेला पराक्रम मिळवलेले महावीरचक्र, परमवीर चक्र, पद्मश्री आणि लढाईमध्ये मिळवलेला सन्मान त्यामुळे महार रेजिमेंटचे कौतुक करण्यात आले. यावेळी माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी महार रेजिमेंटचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष आणि माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत तसेच सैनिक फेडरेशनचे कार्याध्यक्ष नारायण अंकुशे, मुंबई अध्यक्ष सुभेदार सुभाष दरेकर, महासचिव फ्लेचर पटेल, कोषाध्यक्ष सुभेदार तुकाराम सूर्यवंशी, नागपूर विभाग अध्यक्ष संदेश सिंगलकर, मराठवाडा अध्यक्ष सौ. पुष्पा मुंडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मीकांत हंडे, कोकण अध्यक्ष अरविंद गव्हाणकर आणि नाशिक अध्यक्ष आबासाहेब गरुड या सर्वांची उपस्थिती लागली.
यामध्ये सैनिक फेडरेशनच्या कार्याध्यक्ष अंकुशे यांनी सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला. सैनिक फेडरेशनचे मुंबई अध्यक्ष दरेकर यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. सैनिक फेडरेशनचे प्रवक्ता सुभेदार निंबाळकर, जनरल सेक्रेटरी फ्लेचर पटेल आणि सचिव पंकज पवार यांची ही टीम यावेळी उपस्थित होती. महार रेजिमेंटने जो आपल्या देशाला गौरवशाली इतिहास दिला आहे. या रेजिमेंटच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप मोठे सहकार्य आहे सिंहाचा वाटा आहे असे ते म्हणाले. या गौरवशाली इतिहासात महार रेजिमेंटच्या जवानांनी अशाच प्रकारे भर घालावी असे ही यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here