मराठा आरक्षणावरील न्यायालयीन स्थगिती तात्काळ उठवा आ शिरीषदादा चौधरी यांचेमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सकल मराठा समाजाचे निवेदन

shirish-chaudhari

आमदारांचे ढोल वाजवून समर्थन

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – सकल मराठा समाज रावेरच्या वतीने खिरोदा येथे मुखमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत समाजाच्या मागण्या आमदार शिरीषदादा चौधरी यांच्यामार्फत पोहचवण्याकरिता दि २रोजी सकाळी ११वाजता निवेदन देण्यात आले.
यावेळी आमदार शिरीषदादा चौधरी म्हणाले की आम्ही आपल्या मागण्या बाबत सोबत असून आरक्षणाबाबत सरकार सुप्रीम कोर्टात प्रयत्न करीत आहे. अशा समस्या आत्महत्या करून सुटणार नाही तरुणांना सांगितले ,तरी संघर्ष करा निराशा ठेवू नका आणि आत्महत्येचा मार्ग पत्करू नका आम्ही पण आपल्या सोबत आहोत आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करीत आहोत असे मत आमदार शिरीषदादा चौधरी यांनी व्यक्त केले आमदारांनीही स्वतः ढोल बजाओ आंदोलन मध्ये ढोल वाजवून समर्थन दर्शविले.
याबाब सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने दिलेल्या मराठा आरक्षणावरील सर्वोच्य न्यायलयातील अंतरीम स्थगिती उठविण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे . ती स्थगिती राज्य सरकारने त्वरीत उठवावी . मराठा समाजाच्या मुलामुलींचे चालु आर्थिक वर्षापासून फी परतावा राज्य सरकारकडून मिळावा . त्याच बरोबर केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण दिले , त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा . सर्वात महत्वाचे महाराष्ट्र सरकारकडून येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी . अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १००० कोटींची तरतुद करावी , राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबाचे पुर्नवसन करावे . मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे . मराठा आरक्षण आंदोलनात बलीदान दिलेल्या कुटूंबाना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी . अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरु करावे . तसेच राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करावी . कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी . त्याचबरोबर राज्यातील गड किल्यांचे संवर्धन करण्यासाठी ५०० कोटींची तरतुद करावी . मराठा समाजाची शैक्षणिक व नोकरीमध्ये असलेली आरक्षणाची मागणी मान्य होईपर्यंत सकल मराठा समाज , रावेर तालुका यांचा लढा असाच सुरु राहील व गनिमीकावा पद्धतीने विविध आंदोलने करण्यात येतील . अशी या निवेदनाद्वारे सकल मराठा समाज तर्फे यावेळी जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष जे के पाटील तालुका मराठा समाज विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल पंडित ,डॉक्टर सुरेश पाटील, घनश्याम पाटील, राजेंद्र पाटील, योगेश पाटील, पी आर पाटील ,सी एस पाटील, निळकंठ पाटील, जिजाबराव चौधरी, मनोहर पाटील, गणेश चौधरी, योगेश महाजन, ललित चौधरी तर कोचुर येथील पंकज पाटील व कमलाकर पाटील यांचेसह बहु संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here