अलिबाग नगरपालिकेचे सफाई कामगार ठरले देवदूत

alibaug-safai-kamgar

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अलिबाग नगरपरिषद कार्यालय येथे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपनगराध्यक्षा अँड. मानसी म्हात्रे, नगरसेविका सुरक्षा शाह, नगरसेविका चित्रलेखा पाटील, नगरसेवक गौतम पाटील, अजय झुंजारराव, अनिल चोपडा आणि इतर सर्व नगरसेवक आणि कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते. महापुरुषांस सर्वांनी अभिवादन केले.
या प्रसंगी रोटरी क्लबच्या वतीने डॉ. किरण नाबर, डॉ. राजेंद्र चांदोरकर आणि इतर डॉक्टर सहकारी यांनी अलिबाग नगरपरिषदेचे मुख्यकार्यकरी अधिकारी महेश चौधरी आणि सफाई कर्मचारी प्रकाश तांबे, रविंद्र गायकवाड, नितिन अडसुळे आणि इतर कर्मचार्‍यांचा पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन सन्मान केला. या वेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा अँड. मानसी म्हात्रे, नगरसेविका चित्रलेखा पाटील आणि इतर सर्व नगरसेवक उपस्थित होते.
कोरोनावर मात करण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करीत आहे. डॉक्टर, नर्स आणि सफाई कर्मचा-र्यांचा यामध्ये समावेश आहे. समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस हे सर्व जण काम करीत असल्याने तेच खरे देवदूत आहेत, सर्व जण कोविड योद्धा आहेत, असे डॉ. किरण नाबर सत्कारा प्रसंगी म्हणाले. अलिबाग नगरपरिषद स्वच्छतेच्या बाबतीत कायमचं अग्रेसर असते. नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुख्यकार्यकरी अधिकारी महेश चौधरी आणि सर्व नगरसेवक स्वच्छतेच्या बाबतीत कायमचं तत्पर असतात. यांच्या मुळेच आपले अलिबाग शहर स्वच्छ अलिबाग सुंदर अलिबाग आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here