कपडे खरेदी करण्याचा बहाण्याने हातचलाखी करून कापड दुकानातील मोबाईल चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

pune-crime

पुणे (प्रतिनिधी नारायण शेळके) – शुक्रवार (दि २) पुणे सोलापूर रोड वर पेट्रोलिंग करीत असताना यवत पोलिस स्टेशन गु र नं ८३३/२०२० भा द वी का कलम 379 नुसार दाखल असून सदरच्या गुन्ह्यात फिर्यादी यांचे यवत रेल्वे स्टेशन रोड वर महिमा कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे . दि २७/८/२०२० रोजी सकाळी ११:०० व च्या दरम्यान दोन अज्ञात इसम कपडे खरेदी करण्यासाठी आले होते सदरच्या 2 अनोळखी यांनी दुकानात असलेला सॅमसंग कंपनीचा j6 मॉडेलचा 9000 रुपये किमतीचा मोबाईल चोरून घेऊन गेले होते.
सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल व आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास करत असताना सदरच्या गुन्ह्यातील मोबाईल हा इसम नामे अल्ताफ कय्युम मन्सुरी रा. हडपसर हा वापरत असलेबाबत माहिती मिळाल्याने त्याचा शोध घेऊन त्यास थेऊर फाटा परिसरात ताब्यात घेण्यात आले असता त्याचे जवळ गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल मिळून आला त्याच्याकडे मोबाईल बाबत अधिक विचारपूस करता त्याने सदरचा मोबाईल त्याचा मित्र मोहसीन जब्बार बागवान याच्याकडून विकत घेतला असल्याचे सांगितलेने त्यासही ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी मोहसीन जब्बार बागवान (वय 24 वर्षे रा हडपसर पांढरे मळा पुणे), अल्ताफ कय्युम मन्सुरी (वय 21 वर्षे रा हडपसर 15 नंबर लोखंडी पूल हडपसर पुणे) यांना गुन्ह्यातील चोरीस गेलेले मोबाइल्ससह ताब्यात घेवून, पुढील तपासकामी यवत पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, सहा पो फो दत्तात्रय गिरीमकर, पो हवा उमाकांत कुंजीर, पो ना विजय कांचन, पो ना जनार्दन शेळके, पो ना राजू मोमिन, पो शि धिरज जाधव यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here