चाळीसगाव (प्रतिनिधी) – देशभरात गाजत असलेल्या मनीषा वाल्मिकी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी समता सैनिक दलाच्या चाळीसगाव तालुका शाखे च्या वतीने राष्ट्रीय संघटक मा. धर्मभुषण बागुल यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले.आज दि,3 ऑक्टोबर 20 शनिवार रोजी चाळीसगाव तहसील कचेरी येथे हे आंदोलन संपन्न झाले.
मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिक या आंदोलनास उपस्थित होते. या वेळी मनीषा ला न्याय मिळाला पाहिजे अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.ओबीसी नेते व ज्येष्ठ पत्रकार मा.किसनराव जोर्वेकर यांनी याप्रसंगी या हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध करून ,राजकीय व सामाजिक परिस्थिती यास जबाबदार असल्याचे प्रतिपादन केले. धर्मभूषण बागुल यांनी या घटनेचा तीव्र निषेध करताना समता सैनिक दलाची अधिकृत भूमिका देखील जाहीर केली.
ते म्हणाले की , ” असे हत्याकांड जातीय मानसिकतेतून घडतात. असे असंख्य हत्याकांड देशात स्वातंत्र्या पूर्वी व स्वातंत्र्या नंतर देखील घडत आहेत.वेगवेगळे पक्ष सत्तेत येतात व जातात ,परंतु असे जातीय हिंसाचार कधीच थांबले नाहीत.
राजकीय परिस्थिती व सत्ताधारी पक्ष यास जबाबदार आहेत. परंतु त्यापेक्षा जातीयवाद ,जातीय मानसिकता ,उच्च नीचतेची भावना ही याचे मूळ कारण आहे.
आज देश धर्म व जातीत विभागला गेला आहे.त्यामुळे फक्त आम्ही भारतीय आहोत ही संकल्पना ,बंधू भावना अद्याप निर्माण झाली नाही.
आम्ही सर्व भारतीय आहोत ,अशा विचाराचा प्रसार झाला तर….एक मिनिटात जाती नष्ट होऊ शकतात.या साठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मार्गाने देशाने वाटचाल केली व सामाजिक समता ,बंधुभाव निर्माण केला , स्रीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तरच हे हत्याकांड ,हिंसाचार थांबू शकतात ..आम्ही समता सैनिक दलाच्या वतीने हे कार्य हाती घेतले आहे. यापुढे सर्वांनी हातात हात घालून संघटित व्हावे असे ही आवाहन धर्मभुषण बागुल यांनी केले .
खैरलांजी , उन्नाव ,नितीन पागे ई.घटनांना या वेळी उजाळा देण्यात आला. आंदोलन यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष स्वप्नील जाधव ,उपाध्यक्ष विष्णु जाधव,सचिव बाबा पगारे ,संघटक सचिन गांगुर्डे ,,दीपक बागुल ,विशाल पगारे , सैय्यद सलीम भाई ,जीवन जाधव व तरुण पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले .
भाईदास गोलाईत ,महेंद्र जाधव,मनोज जाधव,कारभारी केदार , आदि.ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते. त्याच प्रमाणे नगरसेवक रामचंद्र जाधव ,गौतम जाधव,किरण जाधव,वसंत मरसाळे ,दिनेश मोरे ,रमेश सोनवणे , रोशन जाधव ,प्रदीप अहिरे ,सोमनाथ गायकवाड ,कवी गौतम निकम ,किशोर जाधव अल्लाऊद्दिन भाई ,रियाज शेख ,,संजय गोयर आदि.ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती.
Home राज्य उत्तर महाराष्ट्र समता सैनिक दल चाळीसगाव तालुका शाखेचे भारत कन्या मनीषा हत्याकांड निषेध आंदोलन







