शिरपुर (प्रतिनिधी प्रशांत वाकडे(वरुळ)) – जि.प.शाळा पारशी पाडा येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला जि.प.शाळा पारशी पाडा येथील मुख्या.राजेंद्र पावरा, मनिषा सावळे, अरुण मगरे, गोपाल हटकर तसेच प्रा.आरोग्य केंद्र वाडी येथील आरोग्य पर्यवेक्षक एल.जी.सोमवंशी, आरोग्य सेवक जे.बी.जाधव, आरोग्य सेविका एल.बी.पावरा.शा.व्य.समिती अध्यक्ष रमेश पावरा उपाध्यक्ष गोपाल पावरा.अंगणवाडी सुपरवायझर आर.डी. पावरा, अंगणवाडी सेविका संगिता पावरा,आशावर्कर शहादीबाई पावरा उपस्थित होत्या.तसेच पहिली कन्या झालेल्या सोनी बाई पावरा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.








