कोल्हापूर येथील २ दरोडयाचे गुन्हयात २९ वर्षापासून फरारी असलेले दोघे आरोपी ताब्यात

kolhapur-farar-aropi

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाची कामगिरी

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे आदेशाने रेकॉर्डवरील फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबवित असताना आज दिनांक ०२/१०/२०२० रोजी पुणे ग्रामीण एलसीबी पथकाला मिळालेल्या बातमीवरून मुरगुड पोलीस स्टेशन जिल्हा कोल्हापूर गु.र.नं. १७/१९९१ व १९/१९९१ भा. द.वि. कलम ३९५,३९७ या दोन दरोडयाच्या गुन्हयातील रेकॉर्डवर असलेले फरारी आरोपी काळ्या उर्फ दामू बरोट्या नानावत उर्फ कंजारभट (वय ५९, रा.यवत इंदिरानगर ता.दौंड जि.पुणे), अरविंद उर्फ सेनीर रामलाल राजपूत उर्फ कंजारभट (वय ५८, रा.दत्तवाडी उरुळीकांचन ता.हवेली जि.पुणे) यांना उरुळीकांचन येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर आरोपींची वैदयकिय तपासणी करुन मुरगुड पोलीस स्टेशन जिल्हा कोल्हापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा. महेश गायकवाड, निलेश कदम ,सुभाष राऊत, गुरू गायकवाड, विदयाधर निचित, प्रमोद नवले यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here