मुक्ताबाई विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

vardha-muktabai-vidyalaya

वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – आज दिनांक 2 ऑक्टोंबर 2020 स्थानीक रवींद्रनाथ टागोर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, पुलगाव द्वारा संचालित मुक्ताबाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय समुद्रपूर येथे महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. शरद वांढरे होते.त्यांनी फोटोंचे पूजन करून शात्रीजी तसेच गांधीजींच्या जीवन पटावर प्रकाश टाकला तसेच (Zoom app) च्या माध्यमातून वर्ग 8,9,व 10 च्या विद्यार्थ्यांनी प्रशांत पांढरे, एकनाथ तपासे, गजानन कडू, विनोद इंगळे शरद वांढरे, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जी भाषणे दिलीत त्यांचे अभिनंदन केले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री कडू यांनी केले. संचालन श्री.घुडे तर आभार प्रदर्शन सुनिता गजभिये यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वीरित्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here