घरफोडी करणाऱ्या आरोपीस मुकुंदवाडी पोलीसांकडून अटक

thane-crime

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) – पोलीस ठाणे मुकुंदवाडी गु.र.नं.-३९८/२०२० कलम-४५७,३८०भा.द.वि मधील फिर्यादी नामे विशाल बबन पवार वय-३०वर्षे धंदा-नोकरी रा.लॉट नं.८२ विश्वकर्मा चौक तिरुपती कॅालनी ग.न.१२ जयभवानीनगर मुकुंदवाडी औरंगाबाद.यांनी तक्रार दिली की, दि.२६/१०/२०२० रोजी रात्री ११.००वा.सु.आम्ही व सोबत माझी पत्नी हॉलमध्ये झोपलो व माझी भावजायई मागच्या रुममध्ये झोपलेली असता अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोंडा तोडून व घरात प्रवेश करुन घरातील १)१,१३,१२०/रु कि.चार तोळ्याचे सोन्याचे गंठण किं.अंदाजे.२)४०,०००/रु कि.प्रत्येकी ५ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ३)४५,०००/रु रोख रक्कम, ४) २,५००/रु.किं.अंजु.वा.सोनाटा घडयाळ, ५)१,५००/रु.कि.अंजु.वा.एक पितळी घागर, ६) १५,०००/रु.कि.अंजु.वा.साड्या, ७)१०,०००/रु. कि.अं. जु.वा.चार ड्रेस एकुण २,२७,१२०-रु असे दि.२६/०९/२०२० रोजीचे २३.०० ते दि.२७/०९/२०२० रोजी चे ०६.००वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे.वगैरे मजकुराच्या तक्रारीवरुन पोस्टेला गुन्हा दाखल आहे.
त्यावरुन पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर साहेब यांनी मुकुंदवाडी येथील अधिकारी पोउपनि राहुल बांगर व कर्मचारी यांना सदर गुन्हा आरोपीतांचा शोध घेणे बाबत आदेशित केल्याने सदर गुन्हयातील आरोपी नामे-१)भरत उर्फ जॉन शंकर तिर्थे वय-२८वर्षे रा.जयभवानीनगर गल्ली न.१५,मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन जवळ औरंगाबाद.याचा गुप्त बातमीदारा मार्फत शोध घेवुन सदर आरोपीस नमुद गुन्हात दि.३०/०९/२०२० अटक करुन दि.०१/१०/२०२० रोजी दोन पंचासमक्ष निवेदन जप्ती पंचनाम्या प्रमाणे गुन्ह्यातील गेला माला पैकी ३२,८००/रुपये किं.चा माल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ डॉ.राहुल खाडे, सहायक पोलीस आयुक्त उस्मानपुरा विभाग श्री.रविन्द्र साळोखे, पोस्टे मुकुंदवाडीचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे मुकुंदवाडीचे पोउपनि राहुल बांगर, विकास ढोकरे, सुनिल चव्हाण, अमोल म्हस्के , सफौ कौतिक गोरे,पो.ना.बाबासाहेब कांबळे, पो.शि कैलास काकड, सुनिल पवार, मनोहर गिते, संतोष भानुसे, सुधाकर पाटील, श्याम आढे, चालक रविंद्र बेंडे, सोमनाथ कचरे, पवन अवचार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here