‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ चा प्रारंभ

abhijeet-bangar

‘निश्चय केला – नंबर पहिला’ संकल्पपूर्तीसाठी एकदिलाने प्रयत्न करण्याचे आयुक्तांचे आवाहन

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – एखादे यश मिळविण्यासाठी परिश्रम आवश्यक असतातच, मात्र मिळालेला नंबर टिकविण्यासाठी व त्यात वाढ करण्यासाठी आत्यंतिक परिश्रमाची आवश्यकता असते. यासाठी सज्ज होऊन ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021′ ला सुरूवात होत असताना स्वच्छ शहरांमध्ये असलेला देशातील तिसरा क्रमांक यावर्षी “निश्चय केला – नंबर पहिला’ हे लक्ष्य व ‘क्लिनर टूडे – बेटर टुमारो’ असे ध्येय नजरेसमोर ठेवून गाठायचे आहे अशा शब्दात नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नवी मुंबईकर नागरिकांना आवाहन केले.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करीत सुरू झालेल्या स्वच्छताविषयक विशेष कार्यक्रमाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.

navi-mumbai

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here