सातारा जिल्ह्यातील 14 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह तर 145 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

सातारा (शरद मोरे) – कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे उपचार घेत असलेल्या 14 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये पाटण तालुक्यातील शेंडेवाडी (कुंभारगाव) येथील 18 वर्षीय युवक, 45 व 20 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, कुसरुंड येथील 40 वर्षीय पुरुष, चोपडी येथील 60 वर्षीय महिला,
कराड येथील गजानन हौसिंग सोसायटी येथील 40 वर्षीय पुरुष, चरेगाव येथील 32 वर्षीय पुरुष , शिवडे येथील 36 वर्षीय पुरुष, तारुख येथील 70 वर्षीय पुरुष, कोयना वसाहत येथील 10 वर्षाचा मुलगा, विद्यानगर, सैदापूर येथील 26 वर्षीय महिला,मलकापूर येथील 26 वर्षीय पुरुष, नडशी येथील 31 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
145 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
एन.सी.सी.एस., पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 145 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
तसेच 27 जून रोजी एन.सी.सी.एस. पुणे यांनी कळविलेल्या रिपोर्टमधील 55 वर्षीय पुरुष हा गोडोली येथील असल्याचे कळविले होते, परंतु त्याचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे ता. मावळ असल्याने या बाधिताची नोंद जिल्ह्यातून वगळण्यात आली आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here