राज्य शासनाकडून लोकल सेवा सुरु करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे.
पुणे (प्रतिनिधी अविनाश मुंडे) – मिशन बिगीन अंतर्गत राज्य शासनाकडून लोकल सेवा सुरु करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे त्याच आधारे काही प्रमुख्य शहरांतर्गत रेल्वेसेवा करण्याचे नियोजन मध्य रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे. त्याअंतर्गत पुणे ते मुंबईदरम्यान प्रगती, सिंहगड, इंटरसिटी व डेक्कन एक्सप्रेस या गाड्या सुरु करण्याचे प्रस्तावित आहे
यासंदर्भातील मध्य रेल्वेच्या मुख्य विणिज्य व्यवस्थापकांने परिपञक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मागील सहा महिन्यापासून पुणे व मुंबई दरम्यानची रेल्वेसेवा बंद आहे या दोन शहरामध्ये दररोज ये-जा करणारे अनेक जण आहेत. लाॉकडाऊन काळात त्यांना खाजगी वाहनानी ये-जा करावी लागत होती. आता एसटी सेवा सुरु झाल्याने काही दिलासा मिळाला आहे माञ. एसटी तिकीट दर परवडत नसल्याने रेल्वेसेवा सुरु करण्याची अनेक दिवसानी मागणी आहे. शासनाने नुकतीच लोकल सेवा सुरु करण्यास मान्यता दिल्याने इंटरसिटी रेल्वे ही सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पाश्वभूमीवर रेल्वेचे परिपञक व्हायरल झाले आहे महाराष्ट्र शासनाच्या ३० सप्टेंबरला आदेशानुसार आंतरराज्य रेल्वेगाड्या सुरू करण्याचे प्रस्तावीत
असल्याचे परिपञकात नमुद करण्यात आले आहे या गाड्यांमध्ये डेक्कन, इंटरसिटी, सिंहगड, व प्रगती एक्सप्रेस, समावेश आहे, तसेच मुंबई अमरावती एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस,विदर्भ एक्सप्रेस, तपोवन, सिध्देश्वर, महालक्ष्मी, हुतात्मा, महाराष्ट्र, पुणे-नांदेड, पुणे-नागपुर, पुणे-नागपुर गरीबरथ, पुणे-भुसावळ एक्सप्रेस आदि गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी याबाबत आतापर्यत अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगितले.
अखिल भारतीय युवा कोळी/ कोरी समाजाचे दोंडाईचा शहरं कार्यअध्यक्षपदी हर्षल मोहन कोळी यांची निवड
दोंडाईचा (प्रतिनिधी)-दोंडाईचा येथील सामाजिक कार्यकर्ते हर्षल मोहन कोळी यांची शहर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली
दोंडाईचा येथीलअखिल भारतीय युवा कोळी /कोरी समाज दिल्ली शाखा महाराष्ट्र , धुळे जिल्हा शाखा अंतर्गत दोंडाईचा येथील बैठक नुकतीच संपन्न झाली.सदर बैठक प्रदेशाध्यक्ष संजीव शिरसाट सरचिटणीस डॉ.राजेंद्र सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष संतोष राघो कोळी (पत्रकार ) यांच्या आदेशान्वये बैठक घेतली.
या बैठकीत दोंडाईचा शहर अध्यक्ष मयूर भटू कोळी यांच्या मान्यतेने कार्यअध्यक्षपदी हर्षल मोहन कोळी याची निवड करण्यात आली.
या प्रसंगी उपाध्यक्ष आप्पा कोळी सर सागर कोळी तालुका अध्यक्ष महेंद्र कोळी आदी उपस्थितीत होते. हर्षल कोळी यांची निवडी बद्दल जिल्हा संघटक अनिल जाधव जिल्हा निरीक्षक रवींद्र देवरे संपर्कप्रमुख छोटू सैंदाणे शरद साबळे शांताराम माकडा चेतन शिरसाट इत्यादी कोळी समाजाच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे







