कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ)चळवळ कोल्हापुर जिल्ह्यात पँथर सारखी पुन्हा गतिमान करून जिल्ह्यातील प्रत्येक गावात रिपब्लिकन पक्षांच्या शाखांचे जाळे निर्माण करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले साहेब यांचे हात बळकट करण्याचा संकल्प जिल्हाअध्यक्ष उत्तम कांबळे(दादा) यांनी केला.रिपब्लिकन पक्षाचा 63 व्या “वर्धापनदिना” निमित्त “कोल्हापुर जिल्ह्याच्या” वतीने जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याचे मुस्लिम बोर्डिंग कोल्हापुर येथे दि. 03-10-2020 रोजी आयोजन केले होते.
या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणुन बोलताना उत्तमदादा यांनी वरील प्रतिपादन केले. बिंदु चौक कोल्हापुर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याना पुष्प हार अर्पण करून व अभिवादन करून रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यास जात असताना बिंदू चौक येथून ते दसरा चौक पर्यत टु व्हीलर व फोर व्हीलर मोटर सायकलची प्रचंड मोठी रँली काडून दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास सर्व नेत्यांनी पुष्प हार अर्पण करून अभिवादन केल्या नंतर शेजारील मुस्लिम बोर्डिंगच्या हॉल मधे कार्यकता मेळावा घेण्यात आला.
मेळाव्याचे उदघाटन पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा.शहाजी कांबळे यांनी यांनी केले.प्रा.शहाजी काबळे सर यांनी रिपब्लिकन पक्षाची ध्येय, धोरणे सांगून पक्ष वाढीसाठी सर्वानी काम करावे असे सांगीतले. मेळाव्यात सर्वांचे स्वागत पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी उपाध्यक्ष रुपाताई वायदंडे यांनी केल्या नंतर प्रमुख अधिकार्यांनी मनोगत व्यक्त केले त्यात प्रामुख्याने राधानगरी तालुका उपाध्यक्ष गजानन कांबळे,शिरोळ तालुका अध्यक्ष जयपाल कांबळे,गगनबावडा तालुका अध्यक्ष तानाजी कांबळे, कागल तालुका अध्यक्ष बाबासाहेब कागलकर, हातकणंगले तालुका अध्यक्ष अविनाश अंबपकर, कोल्हापुर शहर अध्यक्ष सुखदेव बुध्याबर,कामगार आघाडी प्र.सचिव गुणवत नागटिळे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा नंदाताई भास्कर आदीनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.त्यानंत करवीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाशिकर, पश्चिम महाराष्ट्र उपाअध्यक्ष कुमार कांबळे,राज्य सह सचिव बी.के.कांबळे, महाराष्ट्र राज्य सचिव मंगळराव माळगे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा ळ शहाजी कांबळे, कोल्हापुर जिल्हा संपर्क प्रमुख मधुकर कांबळे यांनी मार्गदर्शन केले मेळाव्यात RPI(आ) चे अँड.पंडितराव सडोलिकर,अरुन कूडाळे, विलास भामटेकर, राजू वसगडेकर यांच्यासह कोरोना काळात आंबेडकरी चळवळीतील मृत्यूमूखी पडलेल्या 11 भीम योध्याना आधरांजी वाहण्यात आली.तसेच हथसर येथे झालेल्या बलात्कार पीड़ित मनिषा वाल्मीकि यां मुलीस आदराजंली वाहण्यात आली.
मेळाव्यास कोल्हापुर जिल्ह्यातुन सुमारे 500 कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हा उपाअध्यक्ष दीपक भोसले,सूत्रसंचालन जिल्हा युवा अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी केले.तर आभार शहर कार्याध्यक्ष राहुल कांबळे यांनी मानले.







