मुमुंक्ष निधी दिदी कोटडीया यांचा शहादा येथे अभिनंदन समारोह संपन्न

mumuksh-didi

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – शहादा येथे रविवार (दि.४) नंदूरबार येथील मुमुंक्ष भगिनी निधी जयप्रकाश कोटडीया यांचा श्री. अखिल भारतीय साधुमार्गी जैन संघाच्या वतीने अभिनंदन समारोह पार पडला.

 

मुमुंक्ष निधी जयप्रकाश कोटडीया, वय -18,रा.नंदूरबार ह्या दि. 21आँक्टो.2020 रोजी जोधपुर (राजस्थान) येथे श्री. अखिल भारतीय साधुमार्गी जैन संघाचे आचार्य, व्यसनमुक्ती चे प्रणेते प. पु. श्री. रामेश मुनीजी महाराज साहेब यांच्या मुखारविंदाने जैन भगवती दिक्षा अंगीकार करणार आहे, त्या अनुषंगाने आज शहादा येथील श्री. अखिल भारतीय साधुमार्गी जैन संघाच्या वतीने त्यांचा आणि त्यांचा पिताश्रींचा अभिनंदन समारोह, व पुढील संयम पथावर मार्गक्रमण करण्यासाठी आशिर्वाद व शुभेच्छा देण्यात आल्या.

 

यावेळी शहादा येथील श्री. अ. भारतीय साधुमार्गी जैन संघाचे अध्यक्ष जेठमलजी कोटडीया, अमरचंदजी चोरडीया, मोहनलाल जी चोरडीया, बनेचंदजी बोथरा, प्रकाशचंद कोटडीया, श्री. महावीर पतससथेचे संस्थापक चेअरमन रमेशचंदजी चोरडीया, विनयजी गांधी, जसराजजी कोटडीया, व जैन समाजातील बंधू, भगीनी, नवयुवक मंडळ, कन्या मंडळ आदि उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here