मुंबई अग्निशमन दलात नवीन भरतीसाठी आयुक्तांनी दिली परवानगी

anil-galgali

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – अग्निशमन दलात नवीन भरतीसाठी महापालिका आयुक्तांनी परवानगी दिली असून आता लवकरच रिक्त पदे भरली जाणार आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यानंतर नवीन भरतीसाठी मुंबई अग्निशमन दल सज्ज झाले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून रिक्त पदाची माहिती समोर आणत याबाबतीत दिनांक 6 सप्टेंबर 2020 रोजी लेखी तक्रार केली होती. मुंबई अग्निशमन दलाने अनिल गलगली यांस कळविले आहे की मुंबई महापालिकेने दिनांक 30 सप्टेंबर 2019 रोजी जारी केलेल्या परिपत्रकामुळे रिक्त पदे भरता आलेली नव्हती. दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी महापालिका आयुक्तांनी नवीन भरतीवर लावण्यात आलेल्या निर्बंधापासून अग्निशमन खाते वगळण्यात मान्यता दिली आहे.

आजच्या घडीला मुंबई अग्निशमन दलात 25 टक्के पदे रिक्त असून यामुळे कामकाजावर परिणाम होत आहे. अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांनी व्यक्तिशः प्राधान्य दिले आहे. मुंबई  अग्निशमन दल ही अत्यावश्यक सेवा असून रिक्त पदे भरल्यानंतर कामकाजास वेग येईल, अशी प्रतिक्रिया अनिल गलगली यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here