शहादा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आढावा बैठक संपन्न
नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – जिल्ह्यातील शहादा तालुका व शहादा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आढावा बैठक संपन्न झाली. हि आढावा बैठक नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांच्या उपस्थितीत पार पडली.
या आढावा बैठकीत अनेक राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. मध्यंतरीच्या काळात अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून इतर पक्षात सम्मेलीत झाले होते त्यांना पुन्हा पक्षात समोरून घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.तसेच पक्षांमध्ये नवचैतन्य व नवी ऊर्जा निर्माण करण्याची गरज असल्याचे काही कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. आजी व माजी कार्यकर्त्यांमध्ये कोणतीही दुफळी निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करायला हवेत म्हणजेच शहरात पार्टीची विभागणी होणार नाही याकडे जिल्हाध्यक्षांनी लक्ष घालण्याची गरज आहे. 
त्याचप्रमाणे आदिवासी भागातील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आहेत म्हणून पक्षात आदिवासी बांधवांना देखील न्याय देणे गरजेचे आहे.आदिवासी बांधव नेहमीच उपेक्षित राहतात अशी खंत देखील काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.परंतु नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला की पक्षनिष्ठा कार्यकर्त्यांचा नेहमीच गौरव केला जाईल , त्यांना योग्य स्थान दिले जाईल,व्यक्तिनिष्ठ कार्यकर्ते पक्षात चालणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
पक्ष मजबुतीकरणासाठी गावोगावी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटून पक्ष संघटन करण्यात येईल त्याचप्रमाणे पक्ष विस्तार करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील.तसेच केंद्र सरकारने आणलेला शेती विधेयक कायदा हा शेतकऱ्यांच्या विरोधात असून शेतकऱ्यांना नुकसानदायक असल्याचे व भांडवलदारांना पोसणारा आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कामगार विधेयक लागू करून भांडवलदारांना सहकार्य व कामगारांना गुलाम बनवण्याचा या सरकारचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला.जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाला न ऊर्जा देऊन कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण करण्याचा मी प्रयत्न करेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले शहादा _तळोदा मतदारसंघाचे माजी आमदार उदेसिंग पाडवी देखील या बैठकीला उपस्थित होते.यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्षात राहून पुढील वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट केले तसेच राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी व मजबुतीसाठी प्रयत्न करेल असे स्पष्ट केले.या आढावा बैठकीला जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे, उदय सिंग पाडवी, शांतीलाल माळी सुरेन्द्र कुवर , चंद्रकांत पाटील व इतर राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.







