रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचची आज पहुर तालुका जामनेर येथे मिटिंग घेण्यात आली भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमा चे अध्यक्ष नशीर दादा तडवी यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथीस्थानी एकता मंच चे राज्य प्रसिद्धी प्रमुख नुरा दादा तडवी हे होते नुरा दादा तडवी यांनी लवकरच एकता मंच आपल्या समस्या सोडवण्यासाठी सर्व प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. मोठया प्रमाणात तडवी समाजाच्या महिला उपस्थित होत्या, अनेक समस्या महिलांनी मांडल्या जिल्हाअध्यक्ष सलीम भाई तडवी यांनी सर्वांनी एकत्रितपणे संघर्ष केल्या शिवाय समस्या सुटणार नाही या करिता सर्वांनी एकतरी यावे असे आवाहन केले
जिल्हा सदस्य व आदिवासी महामंडळ चे सद्स्य सरफराज दादा तडवी यांनी खावटी योजने विषयी माहिती दिली या प्रसंगीं उत्तर विभाग प्रमुख कादिर दादा तडवी सांडु भाऊ तडवी उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष जबिर भाऊ तडवी जहागीर भाई तडवी आहिरवाडी, पत्रकार समीर भाऊ तडवी,लुकमान दादा तडवी मोरव्हाल व पाचोरा तालुका अध्यक्ष अरीपभाऊ तडवी व पहुरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.







