भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

navi-mumbai-congress

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – देशात सध्या हुकूमशाही सुरू असुन केंद्र सरकारने देशातील शेतकरी आणि कामगार संपवण्याचा विडाच उचलला आहे.असा आरोप करत केंद्र सरकार ने मंजूर केलेल्या शेतकरी व कामगार विरोधी विधेयकाविरोधात नवी मुंबई जिल्हा काँग्रेस दिघा ऐरोली तालुका अध्यक्ष राजु वानखेडेच्या वतीने दिघा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आंदोलन करण्यात आले.

 

यावेळी भाजपा हटाव देश बचावच्या घोषणांनी केंद्र सरकारचा केला धिक्कार करण्यात आला.

 

यावेळी नवी मुंबई काँग्रेसचे निरिक्षक शितलताई म्हात्रे नवी मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अनिल कैशिक, सचिन नाईक प्रदेश सरचिटणीस,अरविंद नाईक जिल्हा उपाध्यक्ष, सानपाडा,जुईनगर तालुका अध्यक्ष महेश पाटील, दिघा ऐरोली तालुका अध्यक्ष राजु वानखेडे,सुदर्शना कौशिक, तुर्भे तालुका अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, युवक काँग्रेसचे सरचिणीस डॉ. विनोद पाटील ,विजय पाटील तसेच मोठ्या संख्येने कोंग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here