नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज छत्रपती माननिय खासदार श्री. उदयनराजे भोसले महाराज संस्थापक असलेल्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या कार्यपद्धती व लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी करण्यात येणारे कार्य तसेच सध्या संपूर्ण रायगड जिल्ह्यात सुरु असलेले समाजकार्य पाहून व राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष राजू मरे, नारायण कोळी, मुंबई संघटक प्रमुख चंद्रकांत धडके (मामा) व मुंबई अध्यक्ष प्रकाशभाई कोळी यांच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्र सहचिटणीस केवलदादा महाडिक यांच्या नेतृत्वाने नवीन पनवेल, खांदा कॉलनी, पनवेल याठिकाणी असणाऱ्या रिक्षाचालकांनी व तरुण कार्यकर्त्यांनी आज राजे प्रतिष्ठान कामगार सेनेत प्रवेश करून कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता बनण्यापेक्षा छत्रपतींचा कट्टर मावळा बनून जनतेची सेवा करण्यासाठी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारले.
यावेळी उपस्थित रिक्षाचालकांनी आम्ही छत्रपतींच्या प्रेमाने व राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून राजे प्रतिष्ठान कामगार सेनेत प्रवेश करत आहोत असे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, पनवेल तालुका सचिव राकेश मोरे, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, सुरेश भोईर, ओमकार महाडिक, अमित पंडित, सौरभ पाटील, अनिल दुन्द्रेकर, राजपाल शेगोकार, कोंडीराम भवर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महिला रिक्षाचालकांनी देखील राजे प्रतिष्ठान कामगार सेनेत प्रवेश केला असून येत्या मोठ्या प्रमाणात अजून राजे प्रतिष्ठान कामगार सेनेत प्रवेश सुरुच राहणार असल्याचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांनी स्पष्ट केले आहे.







