धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजयजी सावंत जिल्हा दौऱ्यावर आले असतांना आले असतांना उपजिल्हाप्रमुख प्रा.पी.एम.पाटील यांनी त्यांचे स्वागत करत त्यांचा सत्कार केला. यावेळी जळगाव ग्रामीण व जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या विषयासंदर्भात अर्धातास दोन्ही नेत्यामध्ये चर्चा झाली.
या प्रसंगी माजी आमदार चंद्रकांतजी सोनवणे,माजी महापौर विष्णूभाऊ भंगाळे, जळगाव महानगराध्यक्ष शरदभाऊ तायडे, महानगरपालिका गटनेते सुनीलभाऊ महाजन, कार्यकर्ते व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दि. 06 ऑक्टोंबर रोजी दुपारी 01 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या अध्यक्षते खाली व संपर्क प्रमुख संजयजी सावंत,जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या उपस्थितीत दुपारी 01 वाजता उपजिल्हा प्रमुख,तालुका प्रमुख,शहर प्रमुख यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
जळगाव जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख संजयजी सावंत यांचा सत्कार करताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख व माजी नगराध्यक्ष प्रा. पी एम पाटील







