आर्वी विभागातील मागील बऱ्याच महिन्यांपासून कोविड-19 च्या कामात असणाऱ्या शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार

vardha-teachers

वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – आज सोमवार दि. 05 ऑक्टोबर 2020 दुपारी 5.00 वाजता वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने मा. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांची त्यांचे दालनात भेट घेतली व खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

 

 

आर्वी, आष्टी, कारंजा विभागात अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मागील कित्येक महिन्यांपासून कोविड-19 करिता सेवा देत आहे. यापूर्वी वर्धा, सेलू, पुलगाव- देवळी विभागातील मागील कित्येक महिन्यांपासून कोविड- 19 साठी सेवा देणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सदर कामातून वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मुक्तता मिळाली होती.

 

 

याच धर्तीवर आर्वी विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात यावा अशी जोरदार मागणी शिष्टमंडळाने  जिल्हाधिकारी यांचे कडे केली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ आर्वी विभागाचे SDO धार्मिक यांचे सोबत दूरध्वनीवरून चर्चा केली व मागील बऱ्याच महिन्यांपासून कोविड-19 साठी काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आज रात्री 12 वाजेपर्यंत कार्यमुक्त करावे असे आदेशित केले. त्यामुळे आर्वी विभागातील सदर कामात असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.vardha-teacher

 

 

याच धर्तीवर मागील बऱ्याच महिन्यांपासून हिंगणघाट, समुद्रपूर विभागात कोविड-19 साठी काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुद्धा कार्यमुक्त करण्याची जोरदार मागणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांचेकडे केली असता त्यांनी हिंगणघाट येथील SDO साहेबांची आजच बदली झालेली आहे, त्यामुळे नवीन SDO नी कार्यभार स्विकारेपर्यंत 2 ते 3 दिवस थांबावे असे सांगितले. त्यामुळे सदर कामासाठी समन्वय समितीचे शिष्टमंडळ 2- 3 दिवसानंतर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहे.

 

यावेळी मुख्याध्यापक संघाचे वर्धा जिल्हा अध्यक्ष सतीश जगताप, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह महेंद्र सालंकार, कोषाध्यक्ष शशांक हुलके, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभागीय कार्यवाह अजय वानखेडे, वर्धा जिल्हा सचिव सुरेश रोठे, खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव सुरेशकुमार बरे, जूनी पेन्शन हक्क संघटनेचे वर्धा जिल्हा सचिव व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा वर्धाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रमोद खोडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here