जळगाव जिल्ह्यातील ५०३ कोरोनाबाधितांनी केली कोरोनावर मात

corona-negative

आज आढळले २२९ कोरोनाबाधित; ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.६) प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात नव्याने २२९ कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५० हजारांच्या जवळ पोहचला आहे. जामनेर तालुक्यात कोरोना संसर्ग वाढता असून, आज सर्वाधिक १०० कोरोनाबाधित आढळले. मात्र जिल्ह्याच्यादृष्टीने दिलासा देणारी गोष्ट म्हणजे नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांपेक्षा दुपटीने म्हणजे ५०३ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

 

आज आढळलेल्या २२९ कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक १०० कोरोनाबाधित जामनेर, जळगाव शहर -२९, जळगाव ग्रामीण-१२, भुसावळ-१२, अमळनेर-११, चोपडा-९, पाचोरा-३, भडगाव-०, धरणगाव-५, यावल-४, एरंडोल-१, रावेर-९, पारोळा-६, चाळीसगाव-२६, मुक्ताईनगर-०, बोदवड-१ आणि अन्य जिल्हा १ असा समावेश आहे.

 

आजवर जिल्ह्यात एकुण ४९ हजार ९४० रूग्ण आढळून आले असून ४४ हजार ८०५ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दरम्यान, आज ३ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकुण १ हजार २०९ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ३ हजार ९२६ रूग्ण जिल्ह्यातील विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सकांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here