मनसेच्या दणक्या नंतर नेरूळ येथील पोद्दार शाळेने सुरु केली ब्लॉक केलेली ऑनलाईन परीक्षेची लिंक

podar-international-school

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – काल पासून पोदार इंटरनेशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा चालू झाल्या आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप फी भरली नाही त्यांना परीक्षा देण्या पासून रोखण्यात येत होते . फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षेची लिंक पोद्दार स्कुलने ब्लॉक केली होती.

 

यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे पालकांच्या तक्रारी आल्यानंतर मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे आणि विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी काल शिक्षण अधिकारी योगेश कडुसकर यांच्याकडे याबाबत तक्रार केल्यानंतर ऑनलाईन परीक्षेची लिंक चालू करण्यात आली होती परंतु आज पुन्हा फी न भरलेल्या विद्यार्थ्यांची लिंक ब्लॉक करण्यात आली अशी तक्रार पालकांकडून प्राप्त झाल्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेत पोद्दार शाळेच्या प्रशासनास धारेवर धरले.podar-navi-mumbai

यावेळी शिक्षण अधिकारी श्री कडुस्कर साहेब यांनीही तिथे येऊन कडक पावले उचलत शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली . यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने शाळा प्रशासनाशी चर्चा करत जर पुन्हा विद्यार्थ्यांच्या परीक्षेची लिंक ब्लॉक केली तर मनसे स्टाईल खळ खट्याक आंदोलन करू असा इशारा मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी दिला.

 

यावेळी शिष्टमंडळात विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, सीवूड्स विभाग अध्यक्ष अमोल आयवळे,मनविसे विभाग अध्यक्ष समृद्ध भोपी, उपविभाग अध्यक्ष अप्पासाहेब जाधव,भरत पासलकर, अखिल खरात, नरेश कुंभार , प्रद्युमन हेगडे उपस्थित होते. podar-school podar-school-mumbai

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here