काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची घणाघाती टीका ‘नरेंद्र मोदी कायर’

rahul-gandhi

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत, त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. काँग्रेसचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनला हाकललं असतं असं वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलं आहे. हरयाणामधल्या सभेत ते बोलत होते. संपूर्ण जगात एकमेव असा देश आहे की ज्या देशात चीनचं सैन्य आलं. भारताची जमीन हडप केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत त्यांनी असं वक्तव्य केलं की भारताची कोणत्याही जमिनीवर चीनने कब्जा केलेला नाही. मात्र सगळ्या देशाला माहित आहे पंतप्रधान काय बोलले होते असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.

 

 

“पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत. त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. १ हजार २०० चौरस किलोमीटर जमीन त्यांनी चीनला देऊन टाकली वरुन स्वतःला मोदी देशभक्त म्हणवतात. चीनमध्ये एवढी हिंमतच नव्हती की आपल्या देशात पाऊलही ठेवतील. पण या घाबरट आणि कायर पंतप्रधानांमुळे चीनची एवढी हिंमत झाली. जगात भारत हा असा एकमेव देश आहे ज्यामध्ये चीनच्या सैन्यानं पाऊल ठेवलं आणि आपली १ हजार २०० चौरस किमी जमीन हडप केली. जर आमचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनच्या सैन्याला बाहेर फेकलं असतं. चीनला १०० किमी मागे ढकललं असतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाची ताकद, शेतकऱ्याची ताकद, मजुराची ताकद समजत नाही”

 

 

लष्कराच्या कोणत्याही जवानांना अधिकाऱ्यांना विचारा ते सांगतील की मोदी हे आपली प्रतिमा जपण्यासाठी देशाशी खोटं बोलले. ते भारत मातेची गोष्ट करतात. त्यांनी भारतमातेचे १ हजार २०० चौरस किलोमीटर चीनला देऊन टाकले. माना किंवा नका मानू पण हे सत्य आहे. याबाबत मोदी काय बोलतात? असा सवालही त्यांनी आज दुपारी केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here