सिंहगड रोड पोलिसांनी हस्तगत केले एक गावठी कट्टा व दोन काडतुसे

shihgad-police

पुणे (प्रतिनिधी नारायण शेळके) – सिंहगड रोड पोलीस स्टेशन अधिकारी/कर्मचारी पोलीस हद्दीत गस्तीवर असताना पोलीस नाईक उज्वल मोकाशी यांना बातमीदारामाफ॔त माहिती मिळाली की नामे अभिजीत सिद्धार्थ भोसले वय 24 वर्ष राहणार वरवे खुर्द ता. भोर जिल्हा पुणे याने बेकायदेशीररित्या आपल्या ताब्यात अग्निशस्त्र ठेवले आहेत.

 

 

सदरची बातमी प्राप्त झाल्यावर सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांनी स्टाफ सह जाऊन सदर आरोपीस तक्षशिला सोसायटी समोर सर्विस रोड वर नऱ्हे पुणे येथे सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याचे जवळ 01 गावठी पिस्टल व 1 काडतुसे मिळून आली .सदर पिस्टल व काडतुसे ही इसम नामे मोन्या विकारे याने दिल्याचे सांगितले असून सदर बाबत सिंहगड पो स्टे येथे आर्म ऍक्ट कलम 3(25) नुसार गुन्हा दाखल करून इसम नामे अभिजीत सिद्धार्थ भोसले वय 24 राहणार वरवे खुर्द ता. भोर जिल्हा पुणे यास अटक करण्यात आली आहे अधिक तपास सुरू आहे.

 

 

सदरची कामगिरी डॉ संजय शिंदे सो अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पौर्णिमा गायकवाड मॅडम , पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-3, श्री पोमाजी राठोड सो , सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, सिंहगड पोलीस स्टेशन चे वपोनि श्री नंदकिशोर शेळके, यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोना माळवे,पोशि झेंडे,पो शी कोंडे, पो ह वा गोसावी, पो शी शेडगे यांचे पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here