हाथरस प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध; धरणगाव तहसिलदारांना दिले निवेदन

dharangaon-ncp

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी.पाटील) – उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एक वाल्मिकी मेहतर दलीत मुलीवर चार नराधमांनी अमानुष बलात्कार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या अमानुष प्रकाराचा निषेध करण्याकरिता धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धरणगाव तहसीलदारांना निवेदन देवून या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, अत्याचारित तरुणी १४ दिवस मुत्युशी झुंज देत दिल्ली येथे हॉस्पीटलमध्ये मुत्यमुखी पडली. पोलिसांनी तिच्या आई वडिलांची परवानगी न घेता शासनाने परस्पर अंत्यसंस्कार केला. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत तरी या चारही आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे व मुख्यमंत्री योगी यांनी त्वरीत राजीनामा दिलाच पाहिजे.

 

 

निवेदन देंतांना तालुकाध्यक्ष धनराज माळी, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, युवक अध्यक्ष नाटेश्वर पवार, दिपक वाघमारे जिल्हाउपाध्यक्ष, ओ बी सेलचे अरविंद देवरे, मोहन नाना पाटील, युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे, संजय पाटील पिंपळे, ओ बो सेल तालुकाध्यक्ष अनिल पाटील, बाजार समिती संचालक रंगनाथ सांवत, सिमा नेहते, माजी महिला अध्यक्ष, उत्तम भदाणे , नारायण चौधरी ,राजु वाणी, किरण पाटील, घनश्याम पाटील , राजु कोळी, प्रमोद जगताप, नदिम काझी , जय पाटील भोणे,दिपक भोई, भुषण पाटिल, सिताराम मराठे , आफ्रोज पटेल, प्रशांत बच्छाव ,नाना बडगुजर, बिसम्मोदिन दादा, गिरीष पाटिल, साईनाथ पाटिल आदि पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here