आयपीएल वर सट्टा लावणारी टोळी जेरबंद, रायगड पोलिसांची कारवाई

raigad-beting

अलिबाग – सोगावकर – युएई येथे सुरु असलेल्या इंडीयन प्रिमीअर लिग अर्थात आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणारे एक मोठं रॅकेट रायगड पोलीसांनी उध्वस्त केले आहे. या प्रकरणी आत्ता पर्यंत ११ जणांना अटक कऱण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाने ही कारवाई केली असून आरोपींना कर्जत, ठाणे आणि मुंबई परीसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

 

 

आयपीएलच्या सामने सुरु झाल्यानंतर जिल्ह्यात कुठे सट्टाबाजार सुरु आहे अथवा नाही याची तपासणी करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर आणि अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ यांनी दिले होते. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाने जिल्ह्यातील विविध भागांत शोध मोहिम सुरु केली. यात कर्जत तालुक्यातील युनिवर्स रिसॉर्टमध्ये सट्टा लावला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीची पडताळणी करून स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाने कर्जत येथील ००७ युनिवर्स रिसॉर्टवर धाड टाकली आणि या आयपीएल सट्टा रॅकेटचा पर्दाफाश झाला.

 

 

ही टोळी आठ मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या सहाय्याने सट्टा लावत होती. प्रत्येक सामन्यानंतर ठराविक पॉईंट्स सट्टा लावणाऱ्यांना दिले जात होते. आठवड्यानंतर जमा झालेल्या पॉईंट्साठी सट्टा खेळणाऱ्यांना हवाला मार्फत रोख रक्कम दिली जात होती. या प्रकरणी पोलीसांनी आत्ता पर्यंत ११ जणांना अटक केली आहे. यात चार मुख्य सट्टेबाजांचाही समावेश आहे. त्यांच्याकडून १७ मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत तर आणखी चार जणांचा शोध सुरु आहे.

 

 

स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाचे प्रमुख जे. ए. शेख, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक संदीप निकाळजे, पोलीस उप निरीक्षक अमित देशभुख यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here