गेल्या आठवडाभरात नवी मुंबईत २० घरफोडय़ा

THIEF

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात २० पेक्षा अधिक घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. पोलीस अभिलेखावरील व नव्याने गुन्हे करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

 

टाळेबंदीत अनेकांची घरे, दुकाने अनेक दिवस बंद होती. मात्र या काळात रात्रंदिवस पोलीस रस्त्यावर होते. त्यामुळे चोरटे सक्रिय नव्हते. मात्र टाळेबंदी शिथिल होताच चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. सर्वाधिक घरफोडय़ा या कोपरखरणे भागात होत आहेत.

 

कोपरखैरणेत सेक्टर १ मध्ये गेल्या आठवडय़ात एकाच दिवसात चार घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यात एका दुकानातून ४० हजारांचा ऐवज चोरटय़ांच्या हाती लागला. या घटनेत तीन दुकानांचे शटर तोडून चोरी करण्यात आली तर एका बंद घरात कडीकोयंडा तोडून चोरी करण्यात आली आहे. सोमवारी नेरुळ येथील हावरे सेंच्युरियन मॉलमधील एक गाळा फोडून लाखोंचा ऐवज चोरी गेला आहे. या ठिकाणी असलेले किमती इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीला गेले आहे. या बाबत नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्’ााची नोंद करण्यात आली आहे. तर रविवारी सीबीडी सेक्टर तीन येथे एक बंद घर फोडून दागिने आणि रोकड असा सुमारे ९ लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांची तीन पथके नेमण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here