वरळी धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या दुर्दशेबाबत अनिल महाजन यांचे पत्र

anil-mahajan

जळगांव (संपादक सुनिल पाटील) – वरळी धर्मदायक आयुक्त कार्यलय दुर्दशा बाबत गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे चेअरमन व वरिष्ठ पत्रकार अनिल महाजन यांनी प्रधान सचिव विधी व न्यायविभाग यांना दिले लेखी पत्र दिले.सक्षम असिस्टंट चॅरिटी कमिशनर नेमण्याची केली मागणी.

 

वरळी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अपूर्ण मनुष्यबळ व भोंगळ कारभाराबाबत दिले पत्र वरळी धर्मदाय आयुक्त कार्यालय हे अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे. राज्यात कोविड कोरोना महामारी सुरू असताना अनेक हॉस्पिटल बाबत अनेक तक्रारी आहेत.त्याबाबत मुंबईतील बहुतांश हॉस्पिटल हे वरळी धर्मदाय आयुक्त कार्यालय अंतर्गत आहे.या कार्यालयात मनुष्यबळ खूप कमी आहे अनेक फायली पेंडिंग आहेत लोकांचे काम वेळेवर होत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे येथे सक्षम अधिकारी कोणीही दिसत नाहीत.

 

याबाबत अनेक वेळा सामाजिक कार्यकर्ते पत्रकार व लोकप्रतिनिधी आमदार महोदय यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. हे कार्यालय विधी व न्याय विभागात येत असल्याने न्यायालाया बाबत जुडीशीयल मध्ये जास्त बोलणे हे उचित नाही याने भारतीय संविधानाला खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो न्यायालय हे न्याय मिळण्याचे सर्वोत्तम ठिकाण आहे वरळी धर्मादाय आयुक्त कार्यालयाची दुर्दशा अतिशय वाईट आहे. अधिवेशनात सभागृह मध्ये कार्यलयतील अधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली गेली आहे हे महाराष्ट्रातील विधी व न्याय विभागाचे खूप मोठे दुर्देव आहे सक्षम पक्षकार आणि वकील यांच्यात समन्वय ठेवणारा अधिकारी असिस्टंट चॅरिटी कमिशनर येथे सद्या तरी कोणीही दिसत नाही जे आहेत ते स्वतःला हायकोर्ट जज पेक्षा मोठं समजतात.यांच्यावर कोणाची कमांड राहिली नाही आहे अशी परिस्तिथी धर्मदायक आयुक्त वरळी कार्यलयात सुरू आहे.

 

सर्वसामान्य जनतेला न्याय कधी मिळणार या बाबत प्रधान सचिव विधी व न्याय विभाग मंत्रालय राजेश लड्डा यांना ई-मेल द्वारे व प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले आहे . सदर पत्रात अजून म्हटले आहे की या कार्यालयाला सक्षम अभ्यासू असिस्टंट चॅरिटी कमिशनर यांची गरज आहे पूर्ण क्षमतेने सर्व रिक्त जागा तात्काळ भराव्या व असिस्टंट चॅरिटी कमिशनर यांना जास्तीचे अधिकार प्रदान करावेत आणि जनतेला होणारा त्रास थांबवा व सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा कार्यालयात दैनंदिन कामासाठी येणाऱ्या पक्षकाराची गैर सोय थांबवावी असे अनिल महाजन यांनी पत्रात नमूद केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here