धडगाव (नंदूरबार) (प्रतिनिधी भुषण पावरा) – काहीक वर्षापासून शेलकुवी येथील रेशन दुकानदार फेंद्रया पावरा यांनी रेशनाच्या गैरवापर करत नागरिकांपर्यंत रेशन न देता परस्पर विल्हेवाट लावत होते ही घटना काहीक वर्षापासून घडत होती तर आता त्याच्यासाठी येथील नागरिकांनी तक्रारही दाखल केली होती निवेदनही दिले होते
त्याची दखल न घेता आजही तोच कारभार चालत असल्याचे चित्र समोर असल्याने नागरिकांनी तहसील अक्राणी यांना निवेदन दिले आहे तसेच शेलकुवी येथील रेशन दुकानदारांच्या परवाना रद्द करून ते रेशन धनाजे बुद्रुक येथे जोडण्यात यावा अशी मागणी यावेळी नागरिकांकडून केली गेली तसेच बिरसा क्रांतीदल मार्फत हे निवेदन देण्यात आले आहे बिरसा क्रांतीदल चे जिल्हाध्यक्ष , कार्यकर्ते तसेच तालुकाध्यक्ष , व तालुका कार्यकर्ते उपस्थित होते 
रोहित पावरा यांनी अशाच पद्धतीने एकजूट होऊन आन्यायासाठी लढा असा विश्वासही यावेळी नागरिकांना दिला खरंतर बिरसा क्रांती दल ही संघटना अन्यायाविरुद्ध लढत आहे त्यामुळे आम्हाला तुमचा साथ हवा असल्याचे मतही या वेळी त्यांनी केला तसेच वेळोवेळी तहसील कार्यालयात जाऊन तक्रार केली तरीही तहसीलदारांनी दखल घेतली नाही व यावेळी ठिय्या आंदोलनाचा मार्ग नागरिकांना यावेळी स्विकारले








