सातारा (शरद मोरे) – कृष्णा 14 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
पाटण तालुक्यातील शेंडेवाडी (कुंभारगाव) येथील 18 वर्षीय युवक, 45 व 20 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, कुसरुंड येथील 40 वर्षीय पुरुष, चोपडी येथील 60 वर्षीय महिला, कराड येथील गजानन हौसिंग सोसायटी येथील 40 वर्षीय पुरुष, चरेगाव येथील 32 वर्षीय पुरुष4, शिवडे येथील 36 वर्षीय पुरुष, तारुख येथील 70 वर्षीय पुरुष, कोयना वसाहत येथील 10 वर्षाचा मुलगा, विद्यानगर, सैदापूर येथील 26 वर्षीय महिला,मलकापूर येथील 26 वर्षीय पुरुष, नडशी येथील 31 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
गोडोली नव्हे तळेगाव-दाभाडे
27 जून रोजी एन.सी.सी.एस. पुणे यांनी कळविलेल्या रिपोर्टमधील 55 वर्षीय पुरुष हा गोडोली येथील असल्याचे कळविले होते, परंतु त्याचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे ता. मावळ असल्याने या बाधिताची नोंद जिल्ह्यातुन वगळण्यात आली आहे, असेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.







