यावल तालुक्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 197

साकळी गांवात कोरोनाचा कहर तर डांभुर्णि गांवात प्रवेश.

यावल (सुरेश पाटील) – यावल तालुक्यात 30 जून पर्यंत कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 23 गांवा मधे 197 झालेली असून त्यापैकी 100 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर 82 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर कोरोना विषाणू बाधेमुळे तालुक्यात आतापर्यंत 15 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
यावल तालुक्यात ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 106 यावल शहरात 42 आणि फैजपुर शहरात 49 अशी संख्या असली तरी काल दिनांक 30 रोजी डांभुर्णी गांवात कोरोना विषाणू प्रवेश केला आहे.
साकळी गांवात मंगळवार (दि. 30 ) रात्री 11 वाजेच्या सुमारास पुन्हा 11 जणाचा कोरोना बाधित रिपोर्ट आला असल्याने साकळी गांवात आता कोरणा बाधित रुग्णांची एकूण संख्या 29 झाली असल्याने साकळीत कोरणा विषाणू कहर माजवित असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here