शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या हस्ते डॉ.सिध्दांत डहाळे यांचा सत्कार

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – जळगाव लोकसभेचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या हस्ते डॉ.सिद्धांत मिलिंद डहाळे (MD.Med)यांनी नुकत्याच झालेल्या NEET Exam मधे (DM प्रवेशासाठी ).,भारतातून ४० व्या क्रमांक व उत्तर महाराष्ट्रातून पहिला क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले.त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल सत्कार करतांना जळगाव लोकसभेचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख व सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे संचालक संजयजी सावंत.,यांचे धरणगावात जोरदार फटाक्यांची आतषबाजीने स्वागत करण्यात आले.

 

 

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ.,लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश भाऊ चौधरी.,उपजिल्हाप्रमुख पि.एम.पाटील सर उपस्थित होते ,सामाजिक कार्यकर्ते व कट्टर शिवसैनिक अक्षय मुथा यांना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले .,व विनोद रोकडे यांचा धरणगांव परीट धोबी समाजाचे युवक अध्यक्ष म्हणून निवडी बद्दल सत्कार करण्यात आला, यावेळी शिवसेना नगरसेवक व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी संजय सावंत यांनी डॉ.सिध्दांत डहाळे.,यांना पुढील डी एम चा वैद्यकीय अभ्यासात शुभेच्छा दिल्या व हिदुंजा हाॅस्पिटल ला काही अडचन आल्यास मी आपल्याला मदत, सहकार्य करण्यास कठीबद्ध आहे असे वचन सांवत यांनी दिले .

 

 

तसेच त्यांच्या हस्ते उमेश सुरेश चौधरी, रामकृष्ण महाजन, सागर ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त सत्कार करण्यात आला यावेळी चर्मकार महासंघाचे अखिल भारतीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, सुरेश महाजन, अहमद पठान,अजय चव्हाण, सुरेखा विजय महाजन, आराधना नंदकिशोर पाटील, मंदाताई जितेंद्र धनगर, उज्ज्वला सुदेश पारेराव, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, माजी नगरसेवक करण वाघरे ,हेमंत चौधरी, धिरेंद्र पुरभे, रवींद्र जाधव, कमलेश बोरसे, सतिश बोरसे, नगराज पाटील,काल शेख, महेन्द्र चौधरी, राहुल रोकडे गोलु चौधरी

 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले आहे, आभार लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी व विलास पवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here