महाराष्ट्रात कृषी विधेयके त्वरित लागू व्हावीत; भाजपातर्फे तहसीलदारांना निवेदन

chopada

महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी

 

 

चोपडा (प्रतिनिधी संदीप ओली) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषी विषयक दोन विधेयके मंजूर झाली असून सदर विधेयक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर व केंद्रीय कृषीराज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी सदर विधेयक लोकसभा व राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर केली आहेत.शेतकरी हिताची विधेयके केंद्र सरकारने मंजूर केली असताना राज्य सरकार मात्र सदर विधेयक महाराष्ट्रात लागू करण्यास नकार देत आहे.महाविकास आघाडी सरकारने सदर विधेयके महाराष्ट्रात तात्काळ लागू करावेत या आशयाचे निवेदन नायब तहसीलदार संजय इखनकर यांना भाजपातर्फे देण्यात आले

 

 

सदर कृषी विधेयकामुळे देशातील शेतकऱ्यांपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या मार्ग मोकळा होणार आहे.हमीभावात शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला जाणार आहे.देशातील कोणत्याही भागात शेतकऱ्यांना आपला माल विकता येणार आहे अशा विविध बाबींचा शेतकरी हिताचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे तरी सदर विधेयकास राज्यसरकार केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांनी केला आहे.

 

 

सदर निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल,मा.पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके ओबिसी सेल अध्यक्ष प्रदीप पाटील,कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक धनंजय पाटील,जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,शेतकी संघ संचालक हिम्मत पाटील,युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार पाठक,सरचिटणीस डॉ. मनोहर बडगुजर ,सोशल मिडीया प्रमुख भरत सोनगिरे,चंद्रशेखर ठाकरे, विजय बाविस्कर,तेजस जैन , प्रवीण चौधरी,मोहित भावे , अमोल पाटील,संजय जैन, हनुमंतराव महाजन,सुनील सोनगिरे,कैलास पाटील,सुरेश चौधरी आदि भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here