कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात आला उपक्रम – सिद्धी महिला कल्याणकारी संस्थेद्वारे वस्तुवाटप

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – मुंबई एस वॉर्ड विभागात सोमवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२० रोजी, सकाळी १०.३० वाजल्यापासून ते २ वाजेपर्यंत शॉप नंबर २, स्वयंभू गणेश मंदिर, कन्नमवार नगर – २ येथील विक्रोळी संस्थेच्या कार्यालयात या विभागामधील शिवछाया, इंदिरा विकास, जयभिम नगर, पैंथर नगर परिसरातील महिलांना सिद्धी महिला कल्याणकारी संस्था मार्फत अध्यक्षा सौ. स्मिता कवडे यांनी मास्क, सॅनिटायझर, सॅनिट्रीपॅड, कोलगेट याचे वाटप केले. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण सदस्य कमलेश केदारे यांच्या सहकार्याने या महिलांच्या रैशनिंग धान्य पुरवठा संदर्भातील प्रश्न, समस्यांचे निरसन यावेळी करण्यात आले.

 

 

 

या परिसरातील लोकांसाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या अभियाना अंतर्गत मोफत अँटीजेन स्वॉब टेस्ट मुंबई महानगरपालिका ‘एस. वॉर्ड आरोग्य विभागाच्या’ वतीने घेण्यात आली. टेस्ट केल्यावर आपला पॉजिटिव अहवाल येतो. अशी चुकीची समज आणि महिलांमधील भितीची मानसिकता कमी करण्यासाठी संस्था अध्यक्षा कवडे यांनी स्वतः ची अँटीजेन स्वॉब टेस्ट करून घेतली. या टेस्टिंगमध्ये जवळ जवळ ९९ टक्के लोकांचा अहवाल नेगेटिव आला. बी. एम्. सी. आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका सौ. सुप्रिया केळकर यांनी कोरोना काळातील त्यांचे अनुभव, कार्य व परिस्थिती लोकांसमोर मांडली.

 

 

 

परिसरातील लोकांनी अजुन काळजी घेऊन कोरोनाविरहित परिसर ठेवण्यास सहकार्य करावे. असे उपस्थित लोकांना आवाहन करण्यात आले. या संपूर्ण उपक्रमात सिद्धि महिला कल्याणकारी संस्थेच्या सदस्या गौतमी शिंदे, रूपा वंजीरे, शीतल बनसोडे, स्नेहल तांबे, संगीता ओडापल्ली, शुषमा लोखंडे यांनी सहकार्य केले. बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेन राठोड त्यांचे सहकारी वंदना घोंगड़े यांच्या सहकार्याने स्वाब टेस्टिंग करण्यात आली. विक्रोळी कन्नमवार नगर पोलीस स्टेशनचे सीनियर पी. आय. केंजले यांनी या उपक्रमाला भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here