शेतजमीन नावे करण्यासाठी पतीपत्नीचा तहसील कार्यलयासमोर आमरण उपोषण

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद तालुक्यातील मौजे म्हैसमाळ येथील लक्ष्मण शंकर मोटे व इंदुबाई लक्ष्मण मोटे दोघे पतीपत्नी दोन हेक्टर वीस आर शेतजमीन नावे करावी म्हणून ०५ आक्टोबर रोजी खुलताबाद तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केला आहे.

 

 

मोटे कुटुंबीय जवळ गेल्या १९९० पासून गट नंबर २१ मौजे अब्दुलपूर गट नंबर ७६ मध्ये दोन हेक्टर वीस आर शेतजमीन अतिक्रमण केलेली आहे. व ती वन हक्कने केली आहे. यात उपविभागीय स्तरीय वनहक्क समिती कन्नड प्रस्ताव माहे मार्च ०५/०३/२०२० दिला आहे. व त्या पूढे जिल्हा अधिकारी औरंगाबाद. वनहक्क जिल्हा स्तरीय समिती यांना पाठवले आहे. व तो प्रस्ताव तातडीने जिल्हास्तरीय समितीने खुलताबाद तहसील कार्यालयात पाठवावा असी मागणी केली होती.

 

 

गत १९९० पासून शासन प्रशासन कडे पाठपुरावा करत आहे. मात्र न्यायच मिळत नसल्याने ०५ आक्टोबर पासून मोटे कुटुंबीय पतीपत्नी ने आमरण उपोषण सुरू केले आहे. आमरण उपोषण दरम्यान काही अनुचित तथा दुर्दैवी प्रकार घडल्यास वनहक्क जिल्हा स्तरीय समिती सर्वस्व जवाबदार राहील असे निवेदनात मोटे कुटुंबीयानी इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here