बहुजन क्रांती मोर्चा जळगावचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

bhahujan-kranti-morcha--2

रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – दि.८ ऑक्टोबर २०२० रोजी बहुजन क्रांती मोर्चा मार्फत भारतातील ३१ राज्य,५५० जिल्ह्यात धरणे आंदोलन करण्यात आले,त्या अंतर्गत जळगाव जिल्हा बहुजन क्रांती मोर्चा मार्फत जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.bhahujan-kranti-morcha-1

 

 

 

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे “मनीषा वाल्मिकी” या बहुजन भगिनीवर तेथील गुंडांनी सामूहिक अत्याचार केल्याने तिचा मृत्यू झाला अपराध्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी बहुजन क्रांती मोर्चा जळगाव जिल्ह्याच्या वतीने आज ०८ अॉक्टो २०२० जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले याविरोधात संपूर्ण भारत देशात 31 राज्यात 550 जिल्ह्यात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

 

 

या मुद्द्यांवर संपूर्ण भारतात आज धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला जळगाव जिल्ह्यातील अनेक जाती व धर्माच्या सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. राष्ट्रीय गोर सेना,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय किन्नर मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, बहुजन मुक्ती पार्टी, राष्ट्रीय किसान मोर्चा, राष्ट्रीय अन्याय अत्याचार निवारण समिती, मेहतर पंचायत,अखिल भारतीय सफाई कामगार संघटना, राष्ट्रीय अतिपिछडा वर्ग, राष्ट्रीय लहुजी क्रांती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा,छत्रपती क्रांती संघ ,भारत मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी ,राष्ट्रीय असंघटित कामगार संघ या व इतर संघटनांनी या धरणे आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला तसेच या आंदोलन यशस्वी करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा जळगाव शहर युनिट ने मेहनत घेतली.bhahujan-kranti-morcha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here