जळगावकरांनी अनुभवला खाकी वर्दीतील कार्यतत्पर माणूस

pravin-mundhe

जळगावचे नुतन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या कार्यतत्परतेचा नागरिकांना सुखद अनुभव

 

 

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – कोरोना महामारीच्या काळात देशातील, राज्यातील पोलिसांनी आपल्या कामातून नागरिकांची मने जिंकली आहेत. एरवी, पोलीस म्हणजे पुढारी आणि पैसेवाल्यांच्या मर्जीतले असा समज अनेकांचा बनला होता. मात्र, लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेची कित्येक उदाहरणे समाजासमोर, मीडियात आली आहे.

 

 

खाकी वर्दीतला माणूस आज जळगावचे नुतन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या रुपाने जळगावकरांनी अनुभवला.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गुरुवार ८ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद बोलवली होती. पत्रकार परिषद आटपुन ते कक्षात जात असतांना त्यांच्या कक्षाबाहेर नागरिक त्यांना भेटण्यासाठी उभे होते. हे बघुन डॉ. प्रवीण मुंढे यांनी कक्षाबाहेरच सर्व नागरिकांजवळ जाऊन त्यांचे म्हणणे ऐकून त्यांचे प्रश्न ही सोडविले आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन ही केले.

 

 

डॉ.मुंढे यांनी दाखविलेल्या या कार्यतत्परतेमुळे त्यांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांची वेळेची बचत ही झाली आणि ताटकळत उभे रहावे लागले नाही. यामुळे खाकी वर्दीतील माणसाच्या रुपाने डॉ. प्रवीण मुंढे यांच्या कार्यतत्परतेचा सुखद अनुभव जळगाव नागरिकांना आल्याची चर्चा सुरु होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here