वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) –
है हमें मायूस होकर लौटना आता नहीं |
राह पर निकले हैं तो मंजिल को पाकर ही रहेंगे ||
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सध्या NPS वरून सगळीकडे रान पेटले असताना संघटनेने देखील कंबर कसली आहे. ज्या माध्यमातून शक्य होईल त्या माध्यमातून आपण संघटना म्हणून प्रयत्नशील आहोत. राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, सचिव गोविंद उगले यांच्या सुचनेतून अनेक भेटींचे नियोजन देखील होत आहे. त्या दृष्टीने आज संघटनेच्या माध्यमातून दोन महत्वाच्या भेटी झाल्या.
गेली ३ – ४ वर्ष सातत्याने राज्यपाल भेटी बाबत आपण प्रयत्नशील होतो. नुकतेच १५ सप्टेंबरला देखील आपण त्यांची भेट मिळावी म्हणून पत्रव्यवहार व कार्यालय संपर्क केला होताच. त्या दृष्टीने आज अखेर राज्यपालांची अधिकृत भेट उपलब्ध झाली. या साठी शिक्षक महासंघाचे शेखर भोयर यांनी देखील विशेष प्रयत्न केले. या वेळी आपल्या संघटनेचे राज्य समन्वयक अरुण घोडे, महिला प्रतिनिधी दीपिका एरंडे मॅडम (औरंगाबाद विभाग), मुंबईचे रविंद्र कोळी उपस्थित होते.
राज्यपाल यांच्यासमवेत जवळपास २२-२५ मिनिटे झालेली चर्चेत जुनी पेन्शन योजना लागू करणे. नो. २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व सरकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी भूमिका या वेळी संघटनेकडून मांडण्यात आली. परंतु त्यावर चर्चा होऊन सदरची योजना सर्वत्र लागू असल्याने त्या बाबत अधिक चर्चा न करता माननीय राज्यपाल महोदय यांनी निवेदनातील दुसरा मुद्दा असणाऱ्या NPS बाबत असलेल्या अडचणी बाबत विचारणा केली.
त्यावरून कुटुंब निवृत्ती वेतन आणि ग्रज्यूटी बाबत त्यांनी माहिती घेतली. उत्तराखंड बाबत त्यांनी स्वतः माहिती दिली व हे लाभ कर्मचारी यांना मिळणे आवश्यक आणि क्रम पात्र असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांना आपले मोर्चे , त्या सोबतच कोणताही राजकीय पाठिंबा नसताना संघटनेने उभे केलेले वादळ याबाबत देखील फोटो सहित माहिती दिली, तसेच आपली पुस्तिका देखील सुपूर्द केली. आमच्या आंदोलनवरून स्थापन झालेल्या कमिटी बाबत देखील सांगून त्या बाबत अहवाल अंतिम टप्प्यात असताना देखील सरकार बदलल्याने थांबला हे यावेळी निदर्शनास आणून दिले.
राज्यपाल महोदय यांनी या बाबत तात्काळ मुख्य सचिव यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. तसेच तातडीने या बाबत मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले आहे. मी गप्प बसणारा राज्यपाल नाही तर सतत कार्यरत असणारा राज्यपाल आहे, त्यामुळे आपल्या या प्रश्नाबाबत मी नक्की सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.
दरम्यान या वेळी इतर काही प्रश्नांवर देखील चर्चा झाली. जसे २००५ पूर्वी नोकरीला लागलेले कर्मचारी यांना निसर्गनियमाने जुनी पेन्शन योजना लागू करणे, त्या सोबत तात्काळ अनुदान वितरण (टप्प्या टप्प्याने अनुदानावर येणारे शाळा बाबत ), कर्मचारी भरती वरील ( शिक्षक) बंदी उठवावी, कोविड १९ आजार वैद्यकीय परिपूर्ती मध्ये घ्यावा आदी, शिक्षकांची आश्वसित वेतनश्रेणी बाबत..! सर्वच प्रश्न महत्वाचे होते तरीही प्राधान्याने ११-१२ मिनिटे किंबहुना त्याहून अधिकची चर्चा ही आपल्या पेन्शनच्या प्रश्नाबाबत झाली.एकंदरीत, प्रत्येक प्रश्न व्यवस्थित लक्षात घेऊन राज्यपालांनी त्या बाबत नक्कीच कार्यवाही होईल असे आश्वासन दिले.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचीही भेट घेण्यात आली. आपल्या मुंडण मोर्चाला उपस्थित राहून संघटनेच्या मागण्यांना पाठिंबा देणारे व आताचे विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी भेट राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वात संपन्न झाली. यावेळी राज कडव गोंदिया जिल्हाध्यक्ष व प्रविण सरगर जिल्हा कोष्याध्यक्ष उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्ष यांनी या विषयाची मला संपूर्ण माहिती असून या प्रश्नाबाबत आत्मीयता देखील असल्याचे सांगितले. संघटेनेचे मोर्चे भव्य आणि नियोजन बद्ध असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. या चर्चे दरम्यान सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही संघटनेची प्रामाणिक भूमिका असून त्या अनुषंगाने वित्त विभाग, शिक्षण विभाग, ग्रामविकास विभाग मधील मुख्य अधिकारी यांच्या समवेत येत्या काही दिवसात लागलीच बैठक आयोजित करणार असल्याचे लेखी आश्वासन त्यांनी आपल्या निवेदनावर दिले आहे.
तसेच संघटना आपल्या मार्गदर्शनाखली लढा अजुन तीव्र करेल, आपण मार्गदर्शक व्हावे, अशी गळ देखील आपल्या उपस्थित टीम ने घातली असता, येत्या आठवड्यात पुन्हा याबत भेटून सविस्तर चर्चा करू असे त्यांनी आश्वस्त केले आहे. लवकरच त्यांची भेट होणार असुन बैठकीचे नियोजन लवकरच होईल यात शंका नाही.
संघटना शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. सध्या राज्यातील, देशातील परिस्थिती विपरीत असताना देखील आपण थांबलो नसून सातत्याने प्रयत्नशील आहोत. कोणत्याही भक्कम आधाराशिवाय संघटना इतक्या ताकदीनं प्रत्येक टप्प्यावर लढत आहे. फक्त आपले बळ हाच तो आधार.! आपणही सर्वांनी आजूबाजूच्या नकारात्मक परिस्थितीने विचलित न होता ठामपणे सोबत उभे रहा. ध्येपूर्तीपर्यंत आपण थांबणार नाही. हजारो अडचणी आणि विपरीत परिस्थितीने कितीही त्रास दिला तर हा संघर्षाचा झेंडा अखंड फडकत राहील, या बाबत नि: संकोचपणे विश्वास ठेवा.







