सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – स्थानिक गुन्हे शाखा व कोरेगाव पोलीस स्टेशनची संयुक्त कामगिरीने कोरेगाव येथील खुनाचा गुन्हा २४ तासात उघड करुन आरोपी जेरबंद केले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दिनांक ३/१०/२०२० रोजी सायंकाळी ५.०० वा.चे पुर्वी कोरेगाव ता.कोरेगाव येथे दौलत टॉकीजच्या मोकळ्या पोर्चमध्ये कोणीतरी अज्ञात आरोपीने कोणत्यातरी अज्ञात कारणवरुन सुनिल नंदकुमार घेरपडे वय ३० वर्षे रा. सायगाव ता.कोरेगाव याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करुन खुन केला. तसेच त्याचेसोबत असलेल्या सायगाव ता.कोरेगाव येथील आनंदा बाळू जाधव याच्या डोक्यात लाकडी दांडके मारुन गंभीर जखमी करुन खुनाचा प्रयत्न केलेबाबत गुन्हा दाखल करणेत आला आहे.
सदर गुन्हा हा बाजारपेठेमध्ये असलेल्या दौलत थेटर समोर झालेला असल्यामुळे सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन श्रीमती तेजस्वी सातपूते पोलीस अधीक्षक, सातारा धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आंचल दलाल, सहा. पोलीस अधीक्षक कोरेगाव यांनी घटनास्थळाला तात्काळ भेट दिली. व गुन्ह्याचे स्वरुप समजावुन घेवुन गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघड करण्याचे दृष्टीने खुनाचा गुन्हा उघड करणेच्या अनुशंगाने सुचना दिल्या.
दि.४/१०/२०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखा सातारा पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना त्यांचे गोपणीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कोरेगाव मधील संशयित इसमाने सदरचा गुन्हा केला आहे. त्यामुळे लागलीच सदर इसमाचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास पथकाने अत्यंत कौशल्याचा पुर्ण वापर करुन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने संशयित आरोपीकडे विचारपुस करुन आरोपीवर प्रश्नांचा भडीमार केला.
सर्वात शेवटी त्याने गुन्हा केल्याचे कबुली देवुन, सदरचा गुन्हा हा संशयित इसम हा घटनास्थळावर थेटरचे समोर दारु पिणेसाठी बसलेला असताना, त्यास मयत सुनिल घोरपडे व जखमी बानु जाधव यांनी दारु पिण्यासाठी पाणी मागीतले असता, संशयित इसमाने दिले नाही म्हणुन त्यास लाथाबुक्यांने मारहाण केल्याने संशयित इसमाने रागाच्या भरात पाठिमागे विहिरीजवळ पडलेले दांडके आणुन दोघांचेही डोक्यात मारुन गंभीर जखमी करुन खुन केला असल्याने सांगीतले.
सदर कारवाईमध्ये श्रीमती तेजस्वी सातपूते पोलीस अधीक्षक, सातारा धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आंचल दलाल सहा पोलीस अधीक्षक, कोरेगाव विभाग कोरेगाव सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थनिक गुन्हे शाखा सातारा कडील सपोनि आनंदसिंग साबळे, सपोनि संतोष साळुखे, पोउनि विशाल कदम, पोहवा सुधीर बनकर, पो.ना. शरद बेबले, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, गणेश कापरे, विशाल पवार व चालक-विजय सावंत-कोरेगाव-पोलीस स्टेशनकडील अमोल सपकाळे, अमोल कणसे, किशोर भोसले, अजित पिंगळे, हेमंत शिंदे, समाधान गाढवे, प्रशांत लोहार, अतुल कणसे, महेश जाधव, अजय गुरुव, तुषार बाबर या पोलीस कर्मचारी यांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला आहे.
सदर कारवाई बाबत श्रीमती तेजस्वी सातपूते पोलीस अधीक्षक, सातारा धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक सातारा, यांनी तपास करणाऱ्या सर्व पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.







