जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन जळगाव जिल्हा संघटनेमार्फत मुख्यवित्तधिकारी विनोद गायकवाड, सहाय्यक वित्तधिकारी श्री.खैरनार यांची DCPS हिशोब पावती संदर्भात भेट घेण्यात आली व यावेळी शिष्टमंडळाने त्यांच्याबरोबर शिक्षकांच्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा देखील करण्यात आली
या चर्चेत जिल्ह्यातील DCPS धारक बांधवांच्या मागील कपातीचा हिशोब पावती बनवण्याचे काम मार्च 2020 पर्यंत पूर्ण झाले आहे, संघटनेच्या महत्वाच्या मागणीनुसार DCPS हिशोब पावती GPF स्लिप सारखी जि.प.जळगाव च्या अधिकृत वेबसाईट वर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
जि.प.वेबसाईट वर स्लिप प्रसिद्ध झाल्याने जिल्हाबदली होऊन स्वतः जिल्ह्यात गेलेल्या हजारो DCPS धारक बांधवांना घरबसल्या आपली स्वतः ची हिशोब पावती मिळणार आहे, शिक्षक सेवानिवृत्त होईपर्यंत आपणास केव्हाही आपला DCPS हिशोब जि.प.वेबसाईट वर केव्हाही बघायला मिळेल, सर्वांच्या प्रयत्नांनी संपूर्ण DCPS हिशोब पावती जि.प.वेबसाईट वर प्रसिद्ध करणारी राज्यातील पहिली जि.प.जळगाव ठरणार हे विशेष.
DCPS हिशोब पावती जि.प.वेबसाईट वर प्रसिद्ध केल्यानंतर सर्व शिक्षकांना आपली पावती आपला स्वतःचा शालार्थ आयडी टाकून बघता येणार किंवा त्यासाठी प्रत्येकाला एक सीरिअल क्रमांक देण्यात येईल याबाबत संघटनेमार्फत कळविण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यात एप्रिल 2014 ते मार्च 2016 मध्ये कपात बंद असल्याने त्या दोन वर्ष्याच्या पावतीवर मार्च 2014 पर्यंतची एकूण रक्कम व प्रत्येक महिनावाईज त्या रक्कमेवर मिळणारे व्याजच दिसेल…. व महिनावाईज कपात नसल्याने तिथे शून्य रक्कम असेल, दोन हप्त्यात कपात केलेली रक्कम एप्रिल 2016 पासून प्रत्येकाची कुटपर्यंत दोन कपाती झाल्या तिथपर्यंत एकत्रित दोन्ही हप्त्याची रक्कम हिशोब पावतीवर (सन.2016,17,18)दिसेल, हिशोब पावती वेबसाइट वर उपलब्ध झाल्यानंतर अनावधानाने पावतीत काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी संघटनेच्या विनंतीवरून जिल्ह्यावर तालुकानुसार कॅम्प लावण्यात येणार आहे.







