वन्यजीव संरक्षण सप्ताहानिमित्त कुऱ्हा पानाचे वन खंडात अभ्यासदौरा

bhusawal-forest

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – वन्यजीव संरक्षण सप्ताहनिमित्त भुसावळ तालुक्यातील कुर्‍हा पानाचे वनक्षेत्र विभाग, वन्यजीव संरक्षण संस्था आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे झालेल्या अभ्यासदौरा अंतर्गत 453 हेक्टर कुऱ्हा पानाचे वन खंड बारा नंबर मध्ये पार पडलेल्या एक दिवसीय अरण्यवाचणात प्राणी, पशु, पक्षी, झाडी, झुडपे, वनस्पती यांच्या विविधांगी प्रजातींचे दर्शन घडले.

 

 

कुऱ्हा पानाचे वनक्षेत्राचे वनपाल महाजन , कुऱ्हा पूर्वचे वनरक्षक संदीप चौधरी, कुऱ्हा पश्चिम चे वनरक्षक विलास काळे भास्कर पाटील नरेंद्र काळे शिवदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास दौरा पार पडला.

 

 

 

यांच्या सोबत वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र सतीश कांबळे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांच्यासह सुरेंद्र चौधरी डी के पाटील सर, संजीव पाटील सर , डॉ जगदीश पाटील सर, सुरेंद्र सिंग पाटील, संजय ताडेकर यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here