जळगांव (प्रतिनिधी गौरव पांडे) – आज जनमत प्रतिष्ठान कडून नवीन बस स्टँड परिसरातkovid विषयी जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते.
या अभियानातंर्गत मास्क वापरा सुरक्षित अंतर ठेवा असे पोस्टर्स प्रत्येक बसेसला लावण्यात आले. बस ड्रायव्हर व कंडक्टर यांचा जनमत प्रतिष्ठानकडून सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष पंकज नाले,अखिल भारतीय शाहू ब्रिगेडचे उपाध्यक्ष किरण कोलते ,गणेश भाऊ जोशी , शाहू ब्रिगेडच्या महिला अध्यक्ष हर्षाली पाटील उपस्थित होत्या.







