नेरुळ येथे लटकत असलेल्या डी.पी. वायर्स भूमीगत करण्यासाठी महापालिकेला विरेंद्र म्हात्रे यांचे निवेदन

नवी मुंबई (विशेष प्रतिनिधी) – नेरुळ , नवी मुंबई येथील डी.पी. बाहेरील लटकणाऱ्या वायर्स भूमीगत करण्यासाठी नवी मुंबई जिल्हा कांग्रेस कमिटीचे सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर व महावितरण अभियंता अण्णासाहेब काळे यांना निवेदन दिले आहे.

 

 

 

नेरुळ, नवी मुंबई सेक्टर -२०, गांवदेवी मंदिरा समोरील  सध्यास्थितीत विद्युत डि.पी. च्या बाहेर चालू विद्युत वायर लटकत असलेल्या स्थितीत आहेत. त्या ठिकाणाहून लोकांची वर्दळ असते. रस्त्यावरुन लोक ये जा करत असतात, दरम्यान लहान मुलदेखिल याठिकाणी खेळत असतात. जर या अश्या विद्युत वाहत असलेल्या वायरला कोणाचा स्पर्श झाला तर भविष्यात पुढे खुप मोठी दुर्घटना होण्याची संभावना नाकारता येत नाही.

 

 

 

या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता सदर डी.पी. बाहेरील लटकणाऱ्या विद्युत  वायर लवकरात लवकर भूमीगत कराव्यात, अशी विनंती महापालिका आणि नवी मुंबई विद्युत केंद्राकडे विरेंद्र म्हात्रे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here