जळगाव (संपादक सुनिल पाटील) – आपल्या निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान, फ़ूड बैंक च्या जेवण वाटप कार्यात वाढदिवस निमित्त किंवा आनंदाच्या व दुःखाचे क्षण आठवण निमित्त आपल्या निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान, फ़ूड बैंक द्वारे गरीब,गरजु लोकांना वाटप करून आपल्या प्रिय जनाना स्मरण केले.
आज पण काही निःस्वार्थ परिवार आपल्या फ़ूड बैंक ला जुळले ते म्हणजे बांबरुड येथील जवरीलाल छाजेड़ जी, ईश्वरलाल छाजेड़ जी,किशोर छाजेड़ जी यांनी चि.महावीर छाजेड़ ( मुलगा) यांचे वडील स्व-डॉ. ललित कुमार जैन यांच्या स्मरणार्थ आज आपल्या निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान, फ़ूड बैंक च्या वतीने रेल्वे स्टेशन परिसरातील गरीब,गरजु व निराधार आजी-आजोबाना जेवनासह मिठाई वाटप केले.
आजचे दूसरे जेवण मनीष जैन जी यांनी आपल्या मुलाच्या स्व-आराध्य जैन यांच्या स्मरणार्थ आपल्या निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान, फ़ूड बैंक च्या वतीने सिव्हिल हॉस्पिटल व टॉवर चौक परिसरातील गरीब,गरजु व निराधार आजी-आजोबाना जेवण व मिठाई वाटप केले यावेळी निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान, फ़ूड बैंक चे है दैनंदिन चालणारे कार्य आज प्रत्यक्ष बघून उपस्थित दोन्ही निःस्वार्थ परिवाराचे मन भरून आले यावेळी जेवण वाटप करताना सोबत प्रतिष्ठानचे धीरज जावळे होते.







