आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबियांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

gulabrao-patil

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव तालुक्यातील वराड बु. येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कै आनंदा शामराव पाटील यांच्या कुटूंबियांची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी घरी जाऊन भेट घेतली.

 

 

यावेळी पालकमंत्र्यांचा हस्ते आत्महत्याग्रस्त शेतक-याची पत्नी श्रीमती संगीताताई आनंदा पाटील यांना शासनाच्यावतीने एक लाख रुपयांच्या मदतीचे वाटप केले. पालकमंत्र्यांचा हस्ते ३० हजार रुपयांचा धनादेश धनादेश व 70 हजार रुपयांची पोस्टाची पावती देण्यात आली.

 

 

याप्रसंगी एरंडोलचे प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसिलदार विनयकुमार देवरे, पं. स. सभापती मुंकुंद नन्नवरे , माजी सभापती अनिल पाटील, टिकाराम पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here