खुलताबादेत एका डोंगरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ

khultabad

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद शहरालगत असलेल्या एका डोंगरावर एका पन्नास वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असुन संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत स्थानिकांनी खुलताबाद पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धावघेत मृतदेह ताब्यात घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

 

 

याबाबत पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार खुलताबाद येथील वनविभागातिला कर्मचारी डोंगरावर रविवारी सकाळी पाहणी करण्यासाठी गेला असता त्याच्या नजरेस एक पन्नस वर्षीय माणसाचे कुजलेले मूतदेह दिसून आला असता त्यांनी लगेच सदरील माहिती खुलताबाद पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांना कळविली.

 

 

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सदरील नागरिकांचा मुर्त्य हा 15 दिवसांपूर्वी झालेल्या असल्याचं अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मूर्त्यदेह पुर्णतः कुजलेल्या असल्याने घटनास्थळीच डॉक्टराणी पोस्ट श्वासदहन केली असून सदरील अनोळखी व्यक्तीची ओळख पडण्यासाठी पोलिस प्रयत्न करत असून पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद घेण्यात आलेली आहे.पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज उदावंत पोलीस नाईक गणेश लीपने निळकंठ देवरे तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here