ताणविरहित परीक्षा आनंददायी आणि उच्चतम यशदायी असते – डॉ मनिषा जगताप

faizpur-webinar

यावल (तालुका प्रतिनिधी डॉ.मोहन साळुंके) – शिक्षण घेतांनाची परीक्षा ही आपली ज्ञान, कौशल्य आणि परिश्रमाची पावती असून परीक्षेचा अनावश्यक ताण न घेता पूर्वतयारी, योग्य मार्गदर्शन आणि अथक परिश्रमातून परीक्षेच्या रुपाने जीवनाच्या अप्रतिम आनंदाला सामोरं जाता येते. उद्यापासून विद्यापीठाच्या पदवी व पदवीत्तर अंतिम वर्षाच्या परीक्षांची योग्य तयारी करून तंत्रज्ञानातील अडचणी समजून, सकारात्मकतेने परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन डॉ मनिषा जगताप, सहाय्यक प्राध्यापिका, बहिस्थ शिक्षण आणि अध्ययन विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी केले.

 

 

 

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या इंटरनल कॉलिटी अश्यूरन्स सेल अंतर्गत एक्झाम स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर एक दिवशीय ऑनलाईन वेबिनार चे आयोजन यशस्वीपणे संपन्न झाले.वेबिनार च्या समारोप सत्राचे अध्यक्ष आय क्यू ए सी चे समन्वयक तथा उपप्राचार्य डॉ उदय जगताप हे होते तर वेबिणारच्या समन्वयिका डॉ सीमा बारी ह्या होत्या.

 

 

 

 

एक दिवशी ऑनलाइन वेबिनार एक्झाम स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर दोन सत्रात पार पडले. त्यात सुमारे 200 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती तर जवळपास 80 विद्यार्थी प्रत्येक्ष सहभागी झाले होते. पहिल्या सत्रात डॉ मनिषा जगताप यांनी ‘परिक्षेला सामोरे जाण्याची आनंददायी तंत्रे’ यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तर द्वितीय सत्र अश्विनी शंकर जाधव, समुपदेशक, पोदार इंटरनॅशनल स्कूल, औरंगाबाद यांनी डिस्ट्रेस ऍक्टिव्हिटी च्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थ्यांना परीक्षेची सोपी तंत्रे सविस्तर उलगडून सांगितली.

 

 

 

 

दोन्ही सत्रात विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत परीक्षेसंदर्भातील अनेक तांत्रिक अडचणींना मार्गदर्शकांनी समर्पक उत्तरे दिली. या एकदिवशीय ऑनलाइन वेबिनार चे प्रास्ताविक समन्वयिका डॉ सीमा बारी यांनी केले. त्यात वेबिनारच्या आयोजनामागील उद्देश सांगत महाविद्यालयातील व्यवस्थापन मंडळ व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, आय क्यू ए सी समन्वयक डॉ उदय जगताप, मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ एस व्ही जाधव यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन होऊ शकले असे मत व्यक्त केले. या वेबिनारचे समारोप सत्राचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ उदय जगताप यांनी जीवन हीच एक परीक्षा असून पावलागणिक प्रत्येकाला वेगवेगळ्या स्वरूपात कोणत्या ना कोणत्या परीक्षेला सामोरे जावे लागते. त्यामुळे परीक्षेचा नकारात्मक ताण न घेता सकारात्मक दृष्टिकोनातून परीक्षेला सामोरे जावे आणि जीवनात उच्चतम ध्येय प्राप्त करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार क्रायटेरिया हेड डॉ ताराचंद सावसाकडे यांनी मानले.

 

 

 

 

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरीषदादा मधुकरराव चौधरी, आमदार रावेर विधानसभा मतदारसंघ, उपाध्यक्ष प्रा डॉ सुधाकर काशिनाथ चौधरी, उपाध्यक्ष श्री दामोदर हरी पाटील, चेअरमन श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन प्रा किशोर रामदास चौधरी, सचिव प्रा मुरलीधर तोताराम फिरके, सदस्य प्रा पी एच राणे, श्री मिलिंदबापू वाघुळदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here