धरणगाव तालुका क्रीडा शिक्षकांची बैठक संपन्न

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव तालुका क्रीडा संकुलना संदर्भात सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक मा.नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांच्या अध्यक्षते खाली नुकतीच संपन्न झाली. तालुका क्रिडा संकुल होऊन अनेक दिवस झाले परंतु त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय झाली असून त्या क्रीडा संकुलाचा वापर विद्यार्थी,क्रीडा प्रेमी,ज्येष्ठ नागरिक यांच्या ऐवजी आंबट शोकीन त्यांचा जास्त वापर करीत असून क्रीडाप्रेमी मध्ये संतापाची लाट तुटलेली असून क्रीडा संकुलाच्या कोणी वारीस आहेकी नाही असे वाटते आहे.

 

 

 

एक कोटी रुपये खर्च करून सुद्धा त्या क्रीडा संकुलाचा वापर खेळाडू साठी होत नसेल तर त्याला काय अर्थ असा प्रतिक्रिया सर्व क्रीडा शिक्षकांनी व्यक्त केल्यास.या प्रसंगी श्री भानुदास अप्पा विसावे,नगराध्यक्ष निलेश चौधरी, मुख्याधिकारी जनार्दन पवार,कैलास माळी सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

 

 

अध्यक्षीय भाषणात पी एम पाटील सर यांनी सांगितले मा.ना.गुलाबरावजी पाटील साो पालकमंत्री यांच्या सहकार्याने तात्काळ क्रीडासंकुल ताब्यात घेऊन त्याची देखभाल केली जाईल व लवकरात लवकर तालुका क्रीडा संकुलन खेळाडू साठी वापरण्यात योग्य केले जाईल देखभाल करण्यासाठी लवकरात लवकर स्थानिक समिती स्थापन करण्यात येईल असे आश्वासन दिले.

 

 

 

प्रस्ताविक तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सूर्यवंशी एस एल सर यांनी केले. या प्रसंगी नगरसेवक अजय चव्हाण, क्रीडाशिक्षक व्ही पी महाले सर,डी एन पाटील सर,आर बी महाले सर,जे एस ओस्तवाल, गावित सर, महानुभव सर, विकास शिरसाठ सर,कल्पेश महाजन सर आदी उपस्थित होते आभार प्रदर्शन विजय महाजन यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here